हरियानातील गॅंगस्टरना माथनीत घातल्या बेड्या, कोट्यवधीची घेतली खंडणी; रायफलने गोळ्या झाडून माजविली दहशत Esakal
नागपूर

Nagpur Police: हरियानातील गॅंगस्टरना माथनीत घातल्या बेड्या, कोट्यवधीची घेतली खंडणी; रायफलने गोळ्या झाडून माजविली दहशत

हरियानात खंडणी आणि चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गॅगस्टरला माथनीजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी कोट्यवधीची खंडणी वसुली केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Police Arrested gangsters From Hariyana: हरियानात खंडणी आणि चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गॅगस्टरला माथनीजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी कोट्यवधीची खंडणी वसुली केली. तसेच ९९९ मोबाईल शॉपीसमोर रायफलने गोळीबार केल्याची माहिती मिळाली. पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बम्बया नीरज फिरोदिया याच्या टोळीने हरियानामध्ये धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी चोऱ्या करून लोकांना वेठीस धरले. तर काही ठिकाणी कोट्यवधीची खंडणी वसूल केल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. आरोपी भगतसिंग तेवतीया (वय २६), रवींद्र सूरजमल दागर (वय २४) नरेंद्र ऊर्फ बिंदर राजेन्द्र तेवतीया (वय २५), सलमान शेरदिन खान (वय १९) रा. छपरोला, ता.जि. पलवल (हरियाना), गौरव शिवसिंग तेवतीया, (वय १९) सर्व रा. रा. छपरोला, ता.जि.पलवल (हरियाना) यांना अटक करण्यात आली आहे.

हे पाचही आरोपी विविध गुन्ह्याखाली पोलिसांना हवे होते. टोळीतील पाचही आरोपी मौदा मार्गे रायपूर येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आज, सकाळी पोलिस अधिकारी अनिल मस्के, मौद्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांना माहिती मिळावी. त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक करण्यासाठी माथनीजवळ थांबले. ज्या वाहनाने आरोपी येत होते. त्या वाहनाला थांबविण्यात आले. (Latest Marathi News )

वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात पाचही आरोपी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. नागपूर पोलिसांना पाचही आरोपींना हरियाना पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT