Loudspeakers controversy permission to temple Events  sakal
नागपूर

'मंदिरातही' कार्यक्रमांना घ्यावी लागणार परवानगी

पोलिस आयुक्तांची ट्रस्टी, पुजाऱ्यांसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनामुळे यापुढे मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी घेण्याचे निर्देश नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आयुक्तांनी या संदर्भात मंदिरांचे विश्वस्त तसेच पुजाऱ्यांसोबत बैठक घेतली.

मनसेच्या इशाऱ्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. शहरात कुठलाही राडा होऊ नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे. कुठल्याही धार्मिक स्थळी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देताना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी पोलिसांना दिल्या आहेत. कार्यक्रमाची माहिती वरिष्ठांनाही देण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. विनापरवानगी कुठल्याही मंदिराजवळ राजकीय कार्यक्रम घेऊ नका असे आवाहन ट्रस्टी व पुजाऱ्यांना केले आहे.

१०० मनसैनिकांना नोटीस

पोलिसांनी शांतता राखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. तत्पूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्याने शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT