नागपूर

नागपूर पोलिस ‘अलर्ट मोडवर’

शहराच्या सीमा सील; विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: दिल्ली पोलिसांनी सहा आतंकवाद्यांना अटक केली असून त्यात मुंबईतील एका आतंकवाद्याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईसह नागपुरातही गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. शहराच्या सीमा सिल केल्या असून विमानतळ आणि रेल्व स्टेशनवरही पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून हॉटेल्स आणि लॉजवरही सर्चिंग सुरू केले आहे.

आतंकवाद्यांना अटक केल्याच्या घटनेनंतर राज्यातील मुंबईतही एकाला अटक केल्यानंतर उपराजधानीतही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अलर्ट मोडवर आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्य दाखवून शहराच्या सीमा सिल केल्या आहेत. उपराजधानीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ४००० पोलिस कर्मचारी आणि १००० रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शहरात ६५ ठिकाणी संवेदनशिल ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.

मिरवणुकांवर बंदी

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशांसह मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असून सार्वजनिक गणेशमंडळांचे केवळ पाचच पदाधिकाऱ्यांना विसर्जन स्थळावर प्रवेश देण्यात येणार आहे. जे मंडळ मिरवणूक काढेल, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. घरगुती गणेशाच्या विसर्जनासाठी आलेल्या महिला व तरुणींच्या सुरक्षेवर विशेष लक्ष असेल. त्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे.

राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत सूचना लक्षात घेता नागपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या आनंदाच्या क्षणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही सर्वतोपरीने सज्ज आहोत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तात लावला आहे. ‘सीपी टू पीसी’ असा बंदोबस्त आहे. बाप्पांना निर्विघ्न निरोप देण्यासाठी पोलिस सज्ज आहेत.

- अमितेश कुमार (पोलिस आयुक्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT