police officers News esakal
नागपूर

Nagpur : कुख्यात गुन्हेगारांसोबत श्वानही पोलिसांच्या रडारवर

तक्रारीसह त्रस्त नागरिकांची घेणार माहिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पुढच्या काळात नागपूर पोलिस मोकाट श्वानांच्या मागे किंवा त्यांच्यावर नजर ठेवत असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गुन्हेगारांवर नजर ठेवणाऱ्या नागपूर पोलिसांना आता शहरातील भटक्या श्वानांद्वारे चावा घेतलेल्यांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि त्यांचा त्रास होणाऱ्या परिसराचीही माहिती द्यावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्तांनी शहरातील पोलिस ठाण्यांसाठी हे परिपत्रक काढले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. याबाबत उच्च न्यायालयाने पोलिस आणि महापालिकेला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एक नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार पोलिस स्टेशन परिसरात किती मोकाट कुत्री आहेत, याबाबत शहानिशा करून त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे निर्देश नागपूर पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित मॉनिटरिंग कमिटीला सूचित करावे, अशा सूचनाही पोलिस आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत.

नागपूर शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्या नागरिकांना २०० रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महापालिकेचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवत तो कायम ठेवला होता. मात्र, हायकोर्टाचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला.

त्यानंतर उच्च न्यायालयाने नागपूर पोलिसांनाही यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांमागे हे अजब काम लागल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा दिला. मात्र, अधिक काही बोलणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT