File Photo esakal
नागपूर

Nagpur Police Recruitment: नागपूरमध्ये पोलीस भरतीत कॉपी! आयुक्तांनी 13 उमेदवारांना पाठवलं घरी; 3 पोलिसही निलंबित

नागपूरच्या पोलीस भरतीत नेमका काय प्रकार घडला जाणून घ्या?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : नागपूरमध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी १३ जणांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर २ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. यामुळं भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 13 परीक्षार्थींना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तांकडं आली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, भरतीच्या लेखी परीक्षा दरम्यान विद्यार्थी कॉपी करत असताना त्याकडं पीएसआय आणि दोन शिपायांनी दुर्लक्ष करत त्यांना परीक्षेत गैरप्रकार करण्यास अप्रत्यक्ष मदत केली.

या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस आयुक्तांनी पीएसआय आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये आता पोलीस आयुक्तांनी 13 परीक्षार्थींना अपात्र घोषित केलं. या धडक कारवाईमुळं आता राज्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT