Nagpur Food Poisoning  Esakal
नागपूर

Police Trainee Food Poisoning: प्रशिक्षणार्थी पोलिसांना जेवणातून विषबाधा, ८ जण रुग्णालयात दाखल; तपासणीसाठी पाठवले नमुने

प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Trainee Police Officers Food Poisoning: प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. रविवारी (ता. १०) सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गृह विभागाने काही महिन्याअगोदर पोलिस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे २०० पोलिस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयात राहत असून, याच परिसरातील कॅन्टिनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करीत असतात.

रविवारी सकाळ पाळीत सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. (Latest marathi news)

या घटनेची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आले आहेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेतील अहवालानंतर समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT