Nagpur  Esakal
नागपूर

Prakash Ambedkar: 'वंचित' महाविकास आघाडीत होणार की नाही? प्रकाश आंबेडकर या दिवशी जाहीर करणार भूमिका

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये वंचितला सहभागी करुन घेण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही निमंत्रक आहोत की मविआचे घटक पक्ष आहोत, याबाबत आम्हाला संभ्रम आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar Loksabha Election: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये वंचितला सहभागी करुन घेण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही निमंत्रक आहोत की मविआचे घटक पक्ष आहोत, याबाबत आम्हाला संभ्रम आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासोबत ६ मार्च रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर आम्ही ८ मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू, असे वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पक्ष आणि जातीयवाद रोखण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी सोबत युतीचा प्रयत्न करू. महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र लढल्यास राज्यात लोकसभेच्या ४० पेक्षा जास्त जागा मिळतील. महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यात बोलणी सुरूच आहे, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला काही सूचना करण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये ४८ उमेदवारांपैकी १५ उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील असावे. तीन उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असावे, अशी सूचना होती. तिसरी सूचना ही कंडीशन संदर्भात आहे असं भासविण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सेक्युलर मतदारांना आश्वासित करण्यासाठी घटक पक्षांनी असे जाहीर करावे की, आम्ही भविष्यात बीजेपी सोबत युती करणार नाही. (Latest Marathi News)

घटक पक्षाला शक्य असेल तर त्यांनी तसा लेखी मसुदा युतीच्या वेळेस जाहीर करावा म्हणजे सेक्युलर मतदारांना खात्री होईल आणि त्यांचा विश्वास बसेल. ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस-शिवसेना यांच्यात १५ जागेवरून तर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ९ जागेवर घमासान सुरू आहे. ६ तारखेपर्यंत महा विकास आघाडीतील या पक्षांनी तोडगा काढून आपला अंतिम निर्णय जाहीर करायला पाहिजे तसेच शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करू असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्यवर्धन पुंडकर, महासचिव मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सहजिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदाशिव, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, माजी मनपा गटनेते गजानन गवई व पराग गवई यांची उपस्थिती होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT