Dr. Sanjay Dobhale , Dr. Sanjeev Moharil, Dr. Ashish Badhye, Dr. Niti Kapoor,  sakal
नागपूर

Nagpur : नागपूर शहरातील चार प्राध्यापकांची जागतिक भरारी; २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश, वाचा त्यांची अद्भुत कामगिरी

Nagpur : नागपूरमधील चार प्राध्यापक जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांच्या दोन टक्के यादीत समाविष्ट झाले आहेत. डॉ. संजय ढोबळे, डॉ. संजीव मोहरील, डॉ. आशिष बढिये आणि डॉ. निती कपूर यांचा संशोधनातील योगदानाचा मान मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी जगभरातील संशोधकांच्या स्कोपस डाटाबेसवरून माहिती घेऊन त्यांचे स्कोपसमधील सायटेशन, एच- इंडेक्स व प्रकाशित शोधनिबंधांची संख्या यावरून दोन टक्के जगभरातील वैज्ञानिकांची यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

यामध्ये भौतिकशास्त्र विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील गुरू-शिष्यांचे नाव २०२४ मध्ये प्रकाशित यादीत आले आहे. डॉ. संजय ढोबळे व डॉ. संजीव मोहरील आणि नुकताच स्वायत्ततेचा दर्जा मिळालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समधील यंग सांयटिस्ट दाम्पत्य डॉ. आशिष बढिये, डॉ. निती कपूर यांचा सलग दुसऱ्यांदा २ टक्के जागतिक संशोधकांच्या यादीत नाव जाहीर करण्यात आले आहे.

डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी आपली पीएचडी डॉ. संजीव मोहरील यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. शुक्रवारी डॉ. संजय ढोबळे (शिष्य) व डॉ. संजीव मोहरील (गुरु) या दोघांचेही नाव जागतिक वैज्ञानिकांच्या दोन टक्के यादीत आले आहे. डॉ. संजय ढोबळे हे नागपूर विद्यापीठात भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ.

संजीव मोहरील हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून ते २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. डॉ. ढोबळे व डॉ. मोहरील हे दोघेही ल्युमिनिसेन्स या विषयावर संशोधन करतात. डॉ. ढोबळे यांचे नाव यापूर्वी सलग चौथ्यांदा दोन टक्के यादीत आलेले आहे. २०२०, २०२१, २०२२,२०२३ व आता २०२४ मध्ये पाचव्यांदा २ टक्के संशोधकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यांचे नाव २०२४ मध्ये स्कॉलर जीपीएस या नामांकित ०.०५ टक्के यादीमध्ये जागतिक स्तरावर आलेले आहे.

यादीमध्ये ल्युमिनिसेन्स मध्ये काम करणाऱ्या एकूण १७ वैज्ञानिकांची नावे आहेत. यामध्ये डॉ. ढोबळे भारतातील एकमेव वैज्ञानिक म्हणून त्यांचे नाव आहे हे विशेष. तर डॉ. संजीव मोहरील यांचे जागतिक स्तरावर २०२४ मध्ये नाव आले आहे व त्यांचे स्कोपसवर ४२८ शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्यांनी एकूण ३६ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे.

बढिये दाम्पत्याची भरारी

इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समधील यंग सांयटीस्ट दाम्पत्य डॉ. आशिष बढिये, डॉ. निती कपूर (बढीये) यांनी आपल्या वयाच्या तुलनेत जागतिक स्तरावरील संशोधनात आघाडी घेतली आहे. फॉरेन्सिक सायन्स विषयात त्यांनी उत्तुंग संशोधन केले असल्याने त्यांचे जागतिक स्तरावर नाव झळकले आहे.

डॉ. आशिष बढीये यांचे २१ हजार ९५४ स्कोपस सायटेशन असून ९६ डॉक्युमेंट आणि ३५ एच इंडेक्स आहेत. याशिवाय डॉ. निती कपूर यांचे २० हजार ५७८ स्कोपस सायटेशन, ८३ डॉक्युमेंट आणि ३० एच इंडेक्स आहेत. दोघांनाही ‘लिगल आणि फॉरेन्सिक मेडिसिन’मध्ये देशातील पहिल्या दहामध्ये चौथा आणि पाचवे स्थान मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT