Nagpur Raid on Hinganya rave party 
नागपूर

नागपूर : ‘हायप्रोफाईल’ पार्टीवर छापा

हिंगण्‍यातील घटना, मोक्का आरोपीसह १० ते १५ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - हिंगणा परिसरातील जामठा परिसरात असलेल्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या ‘हायप्रोफाईल’ पार्टीवर पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यामध्ये मोक्का आरोपी सुमित ठाकूर याच्यासह १० ते १५ जणांना अटक केली. यावेळी पार्टीतून मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि मुलीही ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नामवंत बिल्डर असलेल्या छगन पुनजीभाई पटेल (वय ६५ रा. रामदासपेठ) यांच्या जामठा परिसरातील खरसमारी शिवारात गिरणार नावाचा फार्महाऊस आहे. तिथे रविवारी पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून रितसर परवानगी घेण्यात आली. मात्र, परिसरात मोठ्या आवाजात डिजे वाजत असून तिथे दारू पित हंगामा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेट्रोलिंगवर असलेले पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी गुन्हेशाखेचे पथक, स्थानिक हिंगणा पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी फार्महाऊसवर दहा ते पंधरा जण मुलींसह झिंगत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. यावेळी १० ते १५ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये नुसताच जामिनावर सुटून आलेला मोक्का आरोपी सुमित ठाकूर याचाही समावेश होता. दरम्यान पोलिसांनी हिंगणा छगन पुनजीभाई पटेल (वय ६५ रा. रामदासपेठ), शिव वडेट्टीवार (वय ३२ रा. रहाटे कॉलोनी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

कारवाईनंतर कमालीची गुप्तता

पोलिस उपायुक्त गजाजन राजमाने यांच्या नेतृत्‍त्वात रात्री उशीरा कारवाई केल्यावर त्यांनी आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यानंतर हिंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये शहरातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. त्यातूनच ही गुप्तता पोलिसांकडून पाळण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलिस निरीक्षक परदेसी यांचेंशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

हायप्रोफाईल पार्टीवर छापा टाकल्यानंतर पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी तहसील पोलिस ठाण्यात एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी कारवाईनंतर पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याशिवाय त्यांनी हिंगणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम परदेसी यांची तडकाफडकी बदली केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागेवर इंदोरा येथील वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक असलेले विशाल काळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, आता न्यायमूर्ती अजय गुप्ता यांच्याकडे नीट पेपरफुटीची सुनावणी

Maharashtra Flood Relief: महाराष्ट्राला केंद्राकडून ५०० कोटींच्या 'मदतीचा हात', आगाऊ निधीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Maharashtra Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराला राज्यात चाप! कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; ६० दिवसांची पूर्वसूचना आवश्‍यक

Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT