नागपूर : पॉश पार्लरमधील ‘सेक्स रॅकेट’वर छापा sakal
नागपूर

नागपूर : पॉश पार्लरमधील ‘सेक्स रॅकेट’वर छापा

दोन तरूणींची सुटका : एक दलाल अटकेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी चौकातील भवानी चेंबर येथे असलेल्या पॉश रेडीफाईन व प्रोफेशन फॅमेली सलून ॲंड पार्लरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या दोन तरूणींना ताब्यात घेण्यात आले. रॅकेट चालविणाऱ्या दलालाला अटक करण्यात आली. रवी दशासन चौधरी (जुनी अजनी, चुना भट्टी) असे दलालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी चौधरी याचे रेडीफाईन व प्रोफेशन फॅमेली सलून ॲंड पार्लर आहे. त्याच्या सलूनमध्ये मसाज करण्यात येत होती. पुरूष ग्राहकांना तरूणींकडून मसाज देऊन त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या पार्लरमध्ये मसाज करणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे रवी चौधरी याने वाढती

ग्राहक संख्या बघता पार्लरमधील तरूणींना देहव्यापार करण्यास प्रोत्साहन दिले. ग्राहकाशी संबंध ठेवणाऱ्या तरूणींची पार्लरमध्ये कर्मचारी म्हणून भरती केली. तो मुलींकडून थेट देहव्यावसाय करून घेत होता. रवीच्या सलूनमध्ये रेक्स रॅकेट चालते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिसांनी आपल्या पंटरला या सलूनमध्ये पाठविले. तेथे रवीशी सौदा झाल्यानंतर रवीने दोन मुलींना बाहेर बोलावले.

त्यापैकी एका मुलीची निवड करून तिच्यासोबत खोलीत पाठविले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने या सलूनमध्ये धाड घातली. त्यावेळी पंटर आणि मुलगी एका खोलीत मिळून आले. पोलिसांनी या सलूनमधून दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात पीटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवून नवी चौधरी याला अटक केली. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक मंगला हरडे, संदीप चंगोले, चेतन, महिला शिपाई रिना जाऊरकर, प्रतिमा यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT