Nagpur Railway Parcel warehouse on fire sakal
नागपूर

नागपूर : रेल्वेच्या गोदामाला आग

पार्सलच्या गोदामाला आग; मोठा अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पार्सलच्या गोदामाला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आग लागली. प्रशासनाच्या सतर्कतेने इतरत्र पसरणारी आग त्वरित आटोक्यात आणल्याने मोठी होणारी घटना टळली.

फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पार्सल ऑफिसच्या बाजूला गोडाऊन जवळ अचानक आग लागली. येथे संत्रा मार्केटच्या दिशेने पार्सल कार्यालय आहे. या कार्यालयात मालाची आवक जावक असते. तसेच माल चढविणारे आणि उतरविणारे कामगार नेहमीच असतात. याच धावपळीत सायंकाळच्या सुमारास मालगोदामाला अचानक आग लागली. किरकोळ आग असली तरी वाढत्या तापमानात आग वाढत जाण्याची शक्यता होती. परंतु, रेल्वे प्रशासन आणि उपस्थित कामगारांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान सादिक, नावाच्या एका व्यक्तीने अग्निशमन कार्यालयाला सूचना दिली. क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. पाण्याचा मारा करून आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविले. दरम्यान मालगोदामातील पोती आणि एक जुनी अ‍ॅक्टीव्हा जळाली. जवळपास १० हजारांचे नुकसान झाले. रेल्वेची शंभर टक्के बचत झाली, अशी माहिती अग्निशमन कार्यालयाने दिली.

सिगारेटमुळे कचऱ्यातून आग पसरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. नागपूर मध्यवर्ती स्थानकावर दरदिवशी हजाराच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. आग जर इतर ठिकाणी पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आल्याने प्रवासी व प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

SCROLL FOR NEXT