nagpur rain forecast yellow alert in vidarbha for four days imd weather update Sakal
नागपूर

Nagpur Weather Update : नागपूरसह संपूर्ण विदर्भात वरुणराजाचा धुमाकूळ: विदर्भात चार दिवस यलो अलर्ट

Vidarbha Yellow Alert : जुलैच्या उत्तरार्धात नागपूरसह संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घातल्यानंतर वरुणराजा पुन्हा सक्रीय झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जुलैच्या उत्तरार्धात नागपूरसह संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घातल्यानंतर वरुणराजा पुन्हा सक्रीय झाला आहे. शहरात शुक्रवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस बरसल्याने कमाल तापमानात लक्षणीय घट होऊन वातावरण चांगलेच गारठले. यलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भासह महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आजूबाजूच्या राज्यांमध्ये मॉन्सून सक्रीय झाला आहे. मॉन्सूनचा प्रभाव उपराजधानीतही दिसून आला. शहरात दुपारी बारापासूनच पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत कधी रिमझिम, तर कधी संततधार पावसाने हजेरी लावली.

जवळपास पाच ते सहा तास बरसलेल्या पावसामुळे नागपूरच्या कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन पारा २६.९ अंशांवर आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नागपूरकर चांगलेच गारठले. त्यांना दिवसभर छत्र्या व रेनकोट घालून फिरावे लागले. सूर्यनारायणाचेही दर्शन झाले नाही. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

विदर्भात सर्वत्र पावसाची हजेरी

विदर्भातील गडचिरोली (५७ मिलिमीटर), गोंदिया (३५.२ मिलिमीटर), वर्धा (२२ मिलिमीटर) व वाशीमसह (२० मिलिमीटर) अमरावती, ब्रम्हपुरी व चंद्रपूरमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाचा तीन-चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे विदर्भात आणखी पाऊस अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT