nagpur rain update monsoon weather record rainfall of 67 percent dam water storage Sakal
नागपूर

Nagpur Rain : ‘छप्पर फाड के पाऊस’ शहरात आतापर्यंत ६७ टक्के अधिक पर्जन्यवृष्टी

nagpur rain latest news | दोन आठवड्यांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात संततधार सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांसह आता बळीराजाही वैतागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन आठवड्यांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात संततधार सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांसह आता बळीराजाही वैतागला आहे. जुलैच्या उत्तरार्धात बरसलेल्या धुवांधार पावसाने यंदाच्या पावसाळ्यातील तूट भरून निघाली असून, तब्बल ६७ टक्के अधिक पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे विदर्भातील धरणेही काठोकाठ भरली आहेत.

संपूर्ण जून आणि अर्धा जुलै कोरडा गेल्यानंतर वरुणराजाने विदर्भात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरात गेल्या बारा दिवसांपासून अपवाद वगळता जवळपास रोजच कमी-अधिक प्रमाणात पाऊस नियमितपणे हजेरी लावत आहे. चंद्रपूरचे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यात जूनमधील १४५ मिलिमीटर, तर जुलैमधील ५२० मिलिमीटर पावसाचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ३४७ मिलिमीटर पाऊस पडत असतो. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात ८९३ मि.मी. झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस अमरावती जिल्ह्यात २६२ मि.मी. पडला आहे. अमरावतीचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे.

नागपूरकरांचा `संडे’ घरातच

शहरात शनिवारी रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर बरसल्यानंतर रविवारीही दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. त्यामुळे नागपूरकरांना घराबाहेर पडता आले नाही. पर्यायाने नाईलाजामुळे सार्वजनिक सुटीचा दिवस चार भिंतीच्या आडच घालवावा लागला. प्रादेशिक हवामान विभागातर्फे सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणे भरली तुडुंब, दरवाजे उघडले

दमदार पावसामुळे नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील धरणे तुडुंब भरली आहेत. मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंच चौराई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोह धरण ८२ टक्के भरल्याने संभाव्य धोका लक्षात घेता दोन दरवाजे उघडून ६३.३६८ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. शिवाय गोसेखुर्द, खेकरानाला व वेणा-वडगाव धरणातूनही पाणी सोडावे लागले. आजच्या तारखेला विदर्भातील सर्वच जलाशये तुडुंब भरल्याचे एकूणच आकडेवारीवरून दिसून येत आहे.

विदर्भातील पावसाची आकडेवारी

शहर - एकूण पाऊस

  • नागपूरः ६३१

  • अमरावतीः २६२

  • वर्धाः ५२८

  • भंडाराः ५८८

  • यवतमाळः ५८५

  • अकोलाः ३८८

  • वाशीमः ४०८

  • बुलडाणाः ३७७

  • चंद्रपूरः ७३३

  • गडचिरोलीः ८९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT