आत्महत्या sakal
नागपूर

Nagpur : झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

रामटेक गडमंदिर अंबाळा वनपरिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

रामटेक : दोन अपत्य असलेली महिला युवकाच्या प्रेमात पडली. दोन महिन्यापांसून ती बेपत्ता होती. अखेर या प्रेमवीरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी गडमंदिर रामटेक अंबाळा परिसरातील वनभागात दोघांचे देह लटकलेल्या अवस्थेत आढळले.

मयूर गजानन माणूसमारे (वय ३०) आणि माया (३३, काल्पनिक नाव) यांचे एकमेकांवर प्रेम जडले. हे दोघेही हिंगणा तालुक्यातील रहिवासी होते. मायाचा विवाह झाला असून तिला दोन अपत्ये आहेत तर मयूर हा अविवाहित होता. कांचन पतीच्या घरून गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समजले. परंतु, कदाचित प्रेमभंग किंवा पश्चातापामुळे तिची पतीकडे परत जाण्याची इच्छा झाली.

यासंदर्भात तिचे पतीशी बोलणेही झाले होते. मुलांच्या प्रेमामुळे तीने परत येण्याबाबत पतीशी बोलणे झाले होते, अशी माहिती मायाच्या पतीने दिली. परंतु, या दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे, कॉंस्टेबल शेषराज उके पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT