Nagpur  Sakal
नागपूर

Nagpur : विद्यापीठात चक्क दिल्या धमक्या?

निवडणुकीत सर्रास गैरप्रकाराचा आरोप ८३ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ प्राधिकारिणीच्या निवडणुकीत रविवारी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यांमध्ये ८५ केंद्रावर मतदान सुरक्षित व शांतपणे पार पडल्याचा दावा केला जात असला तरी शहरातील काही केंद्रांवर मतदानासाठी चक्क धमक्यांचा धाक देण्यात आल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८३.६१ टक्के मतदान झाले. उद्या, मंगळवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

विद्यापीठ अधिसभेवर निवडून द्यावयाच्या दहा प्राचार्य मतदारसंघामध्ये १० जागेसाठी विविध संवर्गातील १५, व्यवस्थापन परिषद मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील सहा जागांसाठी १०, महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील १० जागेसाठी २१, विद्यापीठ शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील तीन जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. विद्या परिषदेवर निवडून द्यावयाच्या विविध विद्याशाखेतूनही उमेदवार उभे होते. अभ्यास मंडळावर निवडून द्यावयाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुख निवडून द्यावयाचे असून विविध विद्याशाखेतील अनेक उमेदवार उभे होते. २२ नोव्हेंबरला विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.

३२ अभ्यासमंडळाच्या ९५ जागांवर अविरोध

एकूण ७२ अभ्यास मंडळ (बोर्ड ऑफ स्टडीज)पैकी ३२ अभ्यासमंडळाच्या ९६ जागांवर शिक्षण मंचाचे उमेदवार अविरोध विजयी झाल्याचा दावा केला आहे. या अविरोध निर्वाचितांमध्ये व्हीजेएनटी प्रवर्गातील डीएनसीचे प्राचार्य डॉ. कडते यांचा समावेश आहे. प्रत्येक अभ्यासमंडळासाठी तीन उमेदवार निश्चित करण्यात आले.

मतदारांची संख्या

विविध प्राधिकारिणीसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महाविद्यालयीन शिक्षक ४५४८, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी -२१२ , प्राचार्य -१५३, विद्यापीठ शिक्षक -१४१, विद्या परिषद अभ्यास मंडळामध्ये सर्व विद्याशाखेमध्ये - ४६८१ मतदारांची संख्या होती .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT