Nagpur Roads construction department works cancelled Shinde government Sakal
नागपूर

Nagpur : रस्ते, बांधकामाची कामे रद्द

लोकप्रतिनिधींच्या सूचनांना बगल; शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला पुन्हा एक झटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोकप्रतिनिधींनी सुचवलेली रस्ते, बांधकाम, नाली दुरुस्तीचे कामे रद्द करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला पुन्हा एकदा झटका दिला आहे.

लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींमार्फत (आमदार) सूचविण्यात आलेली कामे करण्यात येते. यात रस्ते, इमारत बांधकाम, नाली दुरुस्तीसह इतर विकास कामांचे समावेश असते. मागील सरकारच्या काळात विरोधी पक्षातील (भाजप) सदस्यांना कमी निधी मिळाला. सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच निधी वाटप केल्याचा आरोप भाजप आमदारांकडून होत होता.

राज्यात सत्ता परिवर्तन होताच जिल्हा नियोजन समितीसह इतर कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली. १ एप्रिल २०२१ पासून ते वर्ष २०२२-२३ मधील कार्यादेश न झालेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. आता सरकारने स्थगिती उठवत पालकमंत्र्यांना निधीच्या खर्चाचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार दिले. त्यामुळे जुन्या अनेक कामांच्या नियोजनात बदल होणार असल्याचे सांगण्यात येते.

१ एप्रिल २०२१ पासून लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ज्या कामांचे कार्यादेश झाले, कार्यादेश झाल्यावर काम सुरू झाले नाही, अशी सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा ठाकरे सरकारला मोठा झटका मानल्या जात आहे.

विकास कामे ठप्प

शासनाने लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेली सर्व काम रद्द केलीत. त्यामुळे आता या लेखाशीर्षअंतर्गत लोकप्रतिनिधींना नव्याने काम प्रस्तावित करावे लागणार आहे. याच बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागात कोणतेही कामे होणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प राहणार असल्याचे सांगण्यात येते.

सदस्यांमध्ये नाराजी

या कामांमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट) सदस्यांच्या कामांचाही समावेश होता. सरसकट सर्व कामे रद्द झाल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यातील १० कोटींची कामे?

या लेखाशीर्ष अंतर्गत जिल्ह्यात १० कोटींपेक्षा अधिकच्या कामांचे प्रस्ताव होते. काही जिल्हा परिषद सदस्यांच्या सर्कलमध्ये १ कोटींची कामे प्रस्तावित असल्याचे सूत्रांकडे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT