Sana Khan sakal
नागपूर

Nagpur Crime : सना खानने लावला होता अमितकडे पैशासाठी तगादा; १५ लाखांत सेटलमेंट करण्याची होती मागणी

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खान यांनी अमित उर्फ पप्पू शाहू याची पार्श्‍वभूमी माहिती झाल्यावर त्यांनी भागीदारी आणि दिलेले सोने आणि पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खान (वय ३४ ,रा.अवस्थीनगर) यांनी अमित उर्फ पप्पू शाहू याची पार्श्‍वभूमी माहिती झाल्यावर त्यांनी भागीदारी आणि दिलेले सोने आणि पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे पप्पूने वैतागून सना यांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पप्पूने एप्रिल महिन्यात सना यांचेशी लग्न केले होते.

कटंगी येथे आशीर्वाद ढाबा सुरू करण्यासाठी सना उर्फ हिना खान यांनी अमित उर्फ पप्पू शाहू याच्याशी व्यावसायिक भागीदारी सुरू असतानाच पाच लाख रुपये व दोन लाखांचे दागिने दिले होते.

सना खानने लावला होता अमितकडे पैशासाठी तगादा

त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याच्याशी लग्न केले. मात्र, त्यानंतर काही दिवसाच त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी सना यांना कळली. त्यामुळे त्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिलेले पैसे, सोनसाखळी परत देत १५ लाखांत सेटलमेंट करण्याची मागणी सना यांनी केली होती. अमितला पैशाची मागणी केल्यावर त्यांची भांडणे व्हायची. २ ऑगस्टला त्या जबलपूरला अमितच्या घरी गेल्यावर त्याने सना यांची हत्या केली. अमितने मित्र राजेश सिंगच्या मदतीने रात्री सना यांचा मृतदेह हिरण नदीतील धरणात फेकला.

लॉकडाऊमध्ये फेसबुकवरून ओळख

अमित उर्फ पप्पू शाहू आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खान यांची लॉकडाऊनदरम्यान फेसबुकवर ओळख झाली होती. दरम्यान त्यानंतर ते २०२१ साली मे महिन्यात एकमेकांना भेटले. त्यानंतर अमितने त्याचा जबलपूर येथील कटंगी मार्गावर आशिर्वाद ढाबा असल्याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही इतर ठिकाणी ढाबा सुरू करण्यासाठी भागीदारी सुरू केली होती.

तपासासाठी पप्पूला जबलपूरला नेणार

नागपूर पोलिसांनी अमित उर्फ पप्पू शाहूला जबलपूरला अटक केल्यावर त्याला शनिवारी (ता.१२) पहाटे नागपुरात आणले. त्याची १८ तारखेपर्यंतची कोठडी मिळवित, तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान पप्पूने हे नेमके कसे काय केले? याचा तपासणीसाठी पोलिस त्याला जबलपूरला नेणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT