Sanitary-Napkin sakal
नागपूर

Nagpur : आता अंगणवाडीतून सॅनिटरी नॅपकीन ; महिला व बाल कल्याण विभागाची योजना

आजही ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मासिक पाळीदरम्यान मुलींकडून कापडाचा उपयोग होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आजही ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मासिक पाळीदरम्यान मुलींकडून कापडाचा उपयोग होता. यातून आजार होण्याची भीती असते. त्यामुळे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभागाची आहे. अंगणवाडीतून या नॅपकीनचा पुरवठा होणार असून एका मुलीला ४१ नग देण्यात येणार आहे.

मासिक पाळीच्या दिवसांमध्येही दिवसभर बाहेर राहून काम करताना किंवा शाळा, कॉलेजात जाताना ग्रामीण भागातील बऱ्याचश्या मुली कापडाचा उपयोग करतात. वापरलेला कापड कुठेतरी अडगळीत अंधाऱ्‍या ठिकाणी ठेवला जातो. त्यामुळे रॅशेस, जंतूसंसर्गाचा धोका संभवतो. या गोष्टी टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील मुली, महिलांना याबाबत कल्पना नाही. नॅपकिनसाठी येणारा खर्च त्यांना परडत नाही. दिवसाला दोनशे रुपयेही कमवू न शकणाऱ्यांना मासिक पाळीवर मोठा खर्च करणे परवडत नाही.

दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्‍या महिलाही सर्वसाधारणपणे कापडच वापरतात. पाळीच्या दोन-तीन दिवसांमध्ये या महिला घरीच राहतात. नॅपकीन विकत घेणे त्यांना परवडत नाही. काम करताना कापड बदलणे शक्य होत नाही.

कापड बदलले तरी आधी वापरलेले कापड ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून अंगणवाडीच्या माध्यमातून ११ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना ४१ नग सॅनिटरी नॅपकीन देत जनजागृती करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. त्याचे फायदेही सांगितले जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

कापडाच्या वापरामुळे आजार होण्याची भीती असते. सॅनिटरी नॅपकीन हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. याचा नियमित वापर त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अंगणवाडीच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन वाटप केले जाणार आहे. ६ महिन्यात लागणारे नॅपकीन एकाच वेळी देण्यात येतील.

-अवंतिका लेकुरवाळे, सभापती, महिला व बाल कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT