Nagpur Esakal
नागपूर

Nagpur: सोयीसाठी बांधलेल्या पुलाचा होतोय नागरिकांना त्रास, साचलेल्या पाण्यातून काढावी लागतेय वाट, रेल्वेचं दुर्लक्ष

सत्रापूर, सिहोरा येथे जाण्यासाठी सत्रापूर येथे रेल्वे पूल बांधण्यात आला. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुविधा होईल असे वाटत होते.

Manoj Bhalerao

Nagpur Railwaay Bridge Leading Water Logging: सत्रापूर, सिहोरा येथे जाण्यासाठी सत्रापूर येते रेल्वे पूल बांधण्यात आला. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुविधा होईल असे वाटत होते. मात्र, हा पूल डोकेदुखी ठरत आहे. पावसाचे पाणी साचत असल्यामुळे येथून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे विभागाने कन्हान सत्रापूर नवीन आरयुबी रेल्वे अंडरपास पूल मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात सुरू केले होते. रेल्वे पूल नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाचे साचले. हे पाणी तत्काळ काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

रविवारी झालेल्या पावसाचे पाणी पुन्हा येथे साचले. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. वर्षभरापूर्वी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण झाले. १५० वर्ष जुना ब्रिटिश काळातील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान काही ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आणि रेल्वे अंडरब्रिज बनविण्याची मोहीम रेल्वे विभागाने घेतली होती.

यातून सत्रापूर येथे जाण्यासाठी अंडरब्रिज बांधण्यात आला. मात्र,पहिल्याच पावसात येथे पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. यामुळे येथे पाणी काढण्यासाठी पर्याय व्यवस्था करण्यात यावी, तसेच विद्युत व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT