schools sakal
नागपूर

नागपूर : वर्षभरात १२ शाळा बंद तर १,७९६ विद्यार्थी झाले कमी

शिक्षक व शाळांना सर्व सुविधा पुरविल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्याचा क्रम कायम आहे.

नीलेश डोये -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिक्षक व शाळांना सर्व सुविधा पुरविल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्याचा क्रम कायम आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी तब्बल १७९६ विद्यार्थी कमी झाली. तर १२ शाळाही बंद करण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतानाही पटसंख्या कमी होत असल्याने जिल्हा परिषद व शिक्षण विभागाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

खासगी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मागील वर्षीपासून शिक्षण ऑनलाइनरीत्या देण्यात येत आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण भागात आधुनिक मोबाईल व इंटरनेट सुविधांचा प्रश्न आहे. शिवाय एक घरी एकच मोबाईल असून शिकणारी मुले त्यापेक्षा जास्त असल्यानेही मोठी अडचण होत आहे. परंतु कोरोनाचे कारण पुढे करीत वर्ग ऑनलाइन होत आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. तर दुसरीकडे खासगी शाळांनी शिक्षण शुल्कात वाढ केली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधांसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकार योगेश कुंभेजकरांकडून शिक्षकांचे बरेचशे प्रश्न काली काढण्यात आले. त्यांना पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती देण्यात आली. समायोजनेच्या माध्यमातून सुचविलेली शाळा देण्यात आली. अनुकंपाच्या माध्यमातून नवीन शिक्षकही भरती करण्यात येत आहे. परंतु त्यानंतरही शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढत नसल्याची ओरड होत आहे. परिणामी पटसंख्या कमी होत आहे. एकेकाळी या जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थीच मोठ्या पदावर गेलेत. परंतु गेल्या काही काळात सरकारी शाळांना अवकळा आल्याचे चित्र आहे.

डायटच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी,केंद्र प्रमख, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली. प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जात आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती इतरांना देत आहो. काही बदल करण्याची गरज आहे. ते ही होतील. सेतू कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर चांगला परिणाम आहोत. काही दिवसात सकारात्‍मक परिणाम दिसले.

- योगेश कुंभेजकर, सीईओ, जि. प.

ग्रामीण भागातील शाळांच्या अवती- भोवती खासगी शाळा सुरू झाल्यात. मुलांना इंग्रजीत शिक्षण देण्यासाठी पालक खासगी शाळेकडे जातात. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत काही काळासाठी पाठवावे. त्यांना इंग्रजीत शिक्षण देण्यात येईल. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. यामुळे अंगणवाडीतील मुल आमच्या शाळेत येतील. त्याच प्रमाणे भौतिक सुविधाही चांगल्या करण्याचा प्रयत्न आहे.

- भारती पाटील, सभापती, शिक्षण समिती, जि. प.

वर्ष २०२०- २१ ची स्थिती

एकूण शाळा - १५३०

१- ८ विद्यार्थी संख्या - ६७७४७

वर्ष २०२१-२२ ची स्थिती

एकूण शाळा १५१८

विद्यार्थी संख्या ६५९५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT