Sharad Pawar sakal
नागपूर

पवार पुन्हा नागपूरला येणार,राष्ट्रवादीच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजपात अस्वस्थता

राष्ट्रवादीच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजपात अस्वस्थता

राजेश नागरे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार पुन्हा एकदा नागपूरला येणार आहेत. सत्तातरानंतर ते वारंवार विदर्भात राजकीय विणकाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आठवडाभरापूर्वीच शरद पवार नागपूरला आले होते. भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी कोल्हापूर संस्थानच्यावतीने शाहू शहाजी छत्रपती महाराज मानपत्र त्यांना देण्यात आले होते. भटक्या-विमुक्त समाजाला त्यांनी साद घालून पुन्हा संघर्षाच्या मशाली पेटवण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली होती. वेळ कमी असल्याने पुढील भेटीत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीला दिले होते.

आता ते पुन्हा शनिवारी १५ ऑक्टोबरला नागपूरला येणार आहेत. मूळ निवासी यांचे मुलभूत अधिकार या विषयावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित राहणार आहेत. बिरसा मुंडा ब्रिगेड व आदिवासी विचार मंचने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून शरद पवार विदर्भात नव्याने सोशल इंजनिअरिंग करीत असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार यांची प्रत्येक कृती ठरवून आणि विचारपूर्वक असते. ते मागचा पुढचा विचार न करता सहसा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहात नाहीत. पंधरा दिवसात ते नागपूरला दुसऱ्यांदा येत आहे. भाजपने पुणे जिल्हा घेरण्याचा सुरू केलेला प्रयत्न सुरू असल्याने पवार नागपूरकरांना इशारा देत असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT