नागपूर

घनकचरा व्यवस्थापनात नागपूर स्मार्ट सिटीला ‘फाईव्ह स्टार’ मानांकन

राजेश प्रायकर

नागपूर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी पुरस्कार २०२०’मध्ये (Smart City Award) घनकचरा व्यवस्थापनासाठी (Solid waste management) नागपूर स्मार्ट सिटीने ‘फाईव्ह स्टार' मानांकन मिळवले. याशिवाय हवामानासाठी ‘थ्री स्टार’ची (Three star for the weather) कमाई केली आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या शंभर स्मार्ट सिटीमध्ये नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीची कामे वेगाने सुरू आहे. (Nagpur-Smart-City-Five-Star-Rating-in-Solid-Waste-Management)

पूर्व नागपुरात होऊ घातलेल्या या प्रकल्पात जमीन अधिग्रहण आदी पार पडले असून रस्ते, जलकुंभाची कामे सुरू आहे. शुक्रवारी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या पुरस्कारावरही नागपूर स्मार्ट सिटीने छाप पाडल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले. हवामानासाठी नागपूरला थ्री स्टार मिळाले. घनकचरा व्यवस्थापनासाठी फाईव्ह स्टार मिळाल्याचे त्यांनी नमुद केले. याशिवाय डाटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क या वर्गवारीत नागपूर स्मार्ट सिटीला पाचवा क्रमांक मिळाला.

स्मार्ट सिटी पुरस्कार विविध बाबींचे मूल्यांकन करून देण्यात आला. प्रशासन, संस्कृती, नागरी पर्यावरण, स्वच्छता, अर्थव्यवस्था, अंगभूत पर्यावरण, पाणी आणि शहरी गतिशीलता याबाबत मूल्यांकन करण्यात आले. गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या थीमवर शहराच्या कामगिरीची दखल घेतली आहे. ‘ओला कचरा प्रक्रिया’ या थीम अंतर्गत शहराच्या तयारी अहवालात विशेष उल्लेख केला आहे. शहरी नियोजन, हिरवळ, जैवविविधता, ऊर्जा आणि ग्रीन इमारत, हवेची गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यावर मूल्यांकन करण्यात आले आहे.

‘डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क’चे निकालही जाहीर करण्यात आले. यात धोरण, नागरिक, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि परिणाम या पाच घटकांचा समावेश आहे. या मूल्यांकनात १०० ‘स्मार्ट सिटी’मध्ये नागपूर शहर पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

(Nagpur-Smart-City-Five-Star-Rating-in-Solid-Waste-Management)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT