नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांना हवे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते sakal
नागपूर

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांना हवे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते

एसटी महामंडळातील कर्मचारी आर्थिक टंचाईत आ

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबरचे देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकी एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशा मागणी एसटी महामंडळातील सर्व कामगार ससंघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी भत्ते अदा करण्यात यावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरला उपोषण करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळातील कर्मचारी आर्थिक टंचाईत आहेत, यामुळे दुर्देवाने कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. एस.टी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यामुळे आत्महत्या होत असल्याचे आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही बाब गंभीर आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतन अल्प आहे. त्यात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन (निव्वळ देय) अत्यल्प होणार आहे.

दिवाळीसारखा सण तोंडावर आले. त्यात मागील सहा महिन्यांपासून मुलभूत गरजा भागविण्यासाठी कर्ज काढलेले आहे. घरभाडे, राशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण उसणवारीमुळे करणे कठिण झाले हे. दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाई भत्ता थकबाकी, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण १७ संघटना सहभागी आहेत. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के , घरभाडे भत्ता ८, १६, २४ टक्के देण्याचे मान्य केले होते परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही.

- मुकेश तिगोटे, सरचिटणीस-महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT