industry e sakal
नागपूर

उद्योजकांनो! आता अधिकच्या वीजबिलातून होणार सुटका, तरुणांनी शोधलीय भन्नाट आयडिया

मंगेश गोमासे

नागपूर : उद्योगातील पॉवर फॅक्टरमुळे उद्योगाच्या बिलात २० ते ३० टक्के वाढ होत असते. त्यामुळे उद्योगात नेमकी कशामुळे ही समस्या निर्माण होत आहे ते शोधून त्यात सुधारणा करण्याचे काम 'इलेक्ट्रिकल एनर्जी मॅनेजमेंट' च्या माध्यमातून करता येणे शक्य होणार आहे. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी हे सॉफ्टवेअर तयार केले असून त्याद्वारे उद्योगातील विजेचे बिल कमी होण्यास मदत होणार आहे.

उद्योगांमध्ये उत्पादन आणि फायदा या दोन गोष्टींकडे प्रामुख्याने पाहिले जाते. त्यामुळे उद्योगात जितक्या कमी समस्या तितका जास्त फायदा होत असतो. मात्र, उद्योगामध्ये दररोज नव्या समस्या येत असतात. या समस्यांमुळे उत्पादन कमी होण्याची भीती असते. यातील प्रमुख समस्या ही इलेक्ट्रिक हानीची आहे. पॉवर फॅक्टरमुळे उद्योगांना २० ते ३० टक्के अधिकचे बिल भरावे लागते. यामुळे उद्योगांना मोठा फटका बसतो. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी अभिजित भोयर, संदेश वाघमारे, हर्षद वैद्य आणि मयूर डफरे या चार विद्यार्थ्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उद्योगातील समस्यांचे सोल्यूशन देण्याचे काम केले आहे. केवळ सॉफ्टवेअर नव्हे तर त्यासंबंधीचे हार्डवेअर देण्याचेही काम ते करतात. यासाठी त्यांनी 'सेन्सलिव्ह' नावाची कंपनी स्थापन करीत बऱ्याच उद्योगांमधील समस्या सोडविण्याचे काम केले आहे.

अशी सोडवितात समस्या -

उद्योगातील प्रत्येक मशिनवर सेंसर डिव्हाईस लावून त्यामध्ये विजेचा वापर किती होत आहे याचा डेटा मिळविला जातो. हा डेटा सॉफ्टवेअरमध्ये एकत्र करून नेमका कुठे लॉस होतो आहे याची माहिती उद्योजकांना देण्यात येते. त्यानंतर ते लॉस दूर करण्यासाठी सोल्यूशन दिले जाते. यासाठी प्रत्येक युनिटमागे १० हजार रुपयांचा खर्च येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, आता न्यायमूर्ती अजय गुप्ता यांच्याकडे नीट पेपरफुटीची सुनावणी

Maharashtra Flood Relief: महाराष्ट्राला केंद्राकडून ५०० कोटींच्या 'मदतीचा हात', आगाऊ निधीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Maharashtra Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराला राज्यात चाप! कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; ६० दिवसांची पूर्वसूचना आवश्‍यक

Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT