Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur: नाकाबंदीच्या नावाखाली पोलिसांचा पोरखेळ? तपासणीसाठी अडवून ठेवत असल्याने कामगार, विद्यार्थ्यांमध्ये संताप

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. यानिमित्ताने पोलिस प्रशासनाने हिंगणा मार्गावरील जुन्या महापालिका नाक्यावर नाकाबंदी सुरू केली आहे. ही नाकाबंदी केवळ दिखावा असून दुचाकी चालकांचे तपासणी केंद्र बनले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Locals Opposed Nakabandi: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. यानिमित्ताने पोलिस प्रशासनाने हिंगणा मार्गावरील जुन्या महापालिका नाक्यावर नाकाबंदी सुरू केली आहे. ही नाकाबंदी केवळ दिखावा असून दुचाकी चालकांचे तपासणी केंद्र बनले आहे. यामुळे एमआयडीसीतील कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार पोलिसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे. नागपूर व रामटेक लोकसभा क्षेत्रात विवेक ठिकाणी बॅरिकेट लावून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. या नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलीस व निवडणूक विभागाच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी साध्या वेशात तैनात आहेत. वाहतूक पोलिसांचे पथक स्थानिक व शहराच्या विविध वाहतूक विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हिंगणा मार्गावर नागपूर महानगरपालिकेच्या जुन्या नाक्याजवळ पोलिसांची नाकेबंदी आहे. या नाकेबंदी दरम्यान वाहतूक पोलीस केवळ दुचाकी चालकांना अडवून त्यांची कागदपत्रे तपासत आहेत. निवडणूक आचारसंहितेची नाकाबंदी म्हणजे वाहत पोलिसांचे तपासणी केंद्र बनले का? असा प्रश्न विचारला जात आहे.

एखाद्या वाहनात पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम एखाद्या चारचाकी वाहनात आढळल्यास यासंबंधीची तपासणी व चौकशी करण्याचे आदेश नाकाबंदी पथकाला देण्यात आले आहे. नाकाबंदी पथक चारचाकी वाहनांची तपासणी करताना दिसून येत नाहीत. केवळ दुचाकी चालकांना अडविण्यासाठी पोलिसांचे जत्थे तैनात करण्यात आले आहेत‌. नागपूर शहरात वैद्यकीय उपचारासाठी दुचाकी चालक पेशंटला घेऊन जातात. (Latest Marathi News)

त्यांचीही अडवणूक वाहतूक पोलीस करीत आहेत. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी चालकांना थांबवून तपासणी करणे म्हणजे आचारसंहितेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या सर्व प्रकाराची नागपूर शहर पोलीस आयुक्त, नागपूर पोलीस परिमंडळ क्रं.१ उपायुक्त, नागपूर शहर पोलीस वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दखल घेऊन जनतेसोबत होणारा पोरखेळ थांबविणे गरजेचे आहे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थी, पालकांना त्रास

हिंगणा परिसर ‘एज्युकेशन हब’ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच सध्या परीक्षेचा काळ असल्याने दररोज हजारो विद्यार्थी महाविद्यालयात येजा करीत असतात. अशा परिस्थितीत पोलिस विद्यार्थ्यांच्‍या दुचाकी अडवून तपासणी करतात. यात बराच वेळ जात असल्याने पेपर देण्यास उशीर होतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. पण, पोलिसांना याचे काहीच घेणेदेणे नाही. यामुळे पालकही खूपच त्रस्त झाले आहेत.(Latest Marathi News)

कामगारांमध्ये धास्ती

हिंगणा एमआयडीसी परिसरात हजारो कामगार आहेत. तुटपुंज्या वेतनात संसाराचा गाडा हाकत असतात. काही कामगारांकडे दुचाकी आहेत. पोलिस अडविणार तर नाही ना, अशी धास्ती कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कारण वाहन तपासणीसाठी वेळ लागत असल्याने ड्यूटीवर जाण्यास उशीर होत असल्याने अनेक कामगारांचे वेतन कपात केल्या जात आहे. त्यामुळे पोलिस हे लोकांच्या सेवेसाठी आहेत की त्रास देण्यासाठी? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT