nagpur students shine in JEE Advance Nitanshu Bhootada ranked 26th Muhammad Sufiyan ranked 29th  
नागपूर

'जेईई ॲडव्हान्स’मध्ये नागपूरचे विद्यार्थी चमकले; नितांशू भूतडा २६ व्या स्थानी , मुहम्मद सूफियानला देशातून २९ वी रॅंक

‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा २६ मे रोजी झालेल्या परीक्षेला देशभरातून १ लाख ८० हजार २०० विद्यार्थी बसले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशातील नामवंत आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या निकालाची घोषणा रविवारी (ता.९) करण्यात आली. या निकालात नागपूरच्या नितांशु भूतडा याने २६ वे स्थान पटकाविले. यापाठोपाठ मुहम्मद सूफियान याने देशातून २९ वे स्थान मिळविले.

‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा २६ मे रोजी झालेल्या परीक्षेला देशभरातून १ लाख ८० हजार २०० विद्यार्थी बसले होते. यातून ४८ हजार २४८ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना देशातील दर्जेदार आयआयटीमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

शहरातील मुहम्मद सूफियान याने देशातून २९ वे स्थान, देवांश गट्टानी ८७ वे स्थान यांनीही ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेत बाजी मारली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, जेईई मुख्य परीक्षेत देशात पहिला आलेल्या नीलकृष्ण गजरे याने ९४ वे स्थान मिळवले आहे.

आयआयटीत जाणार

नितांशु भूतडा आणि नीलकृष्ण गजरे या दोघांनीही आयआयटी मुंबई येथे संगणक विज्ञान विषयात प्रवेश घेणार असल्याचे सांगितले. या क्षेत्रात चांगल्या संधी असल्याचे नितांशुने सांगितले. तर निलकृष्णला भविष्यात ‘एआय’ क्षेत्रात करिअर करायचे असल्याने संगणक विज्ञान शाखेची निवड करत असल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT