suicide  sakal
नागपूर

Crime news : मोबाईलवर गेम खेळण्यास केली मनाई, इमारतीवरून उडी घेऊन मुलीची आत्महत्या

खाली पडल्यावर स्नेहाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मोबाईलवर गेम खेळण्यास रोखल्याने चवथ्या माळ्यावरून १९ वर्षीय मुलीने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.२८) सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलिस हद्दीतील म्हाडा कॉलनीतील पंचम अपार्टमेंटमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्नेहा पंकज शर्मा (वय १९, रा. कडू लेआउट, म्हाडा कॉलनी) असे मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहाचे वडील खासगी कंपनीत कामाला असून आई घरीच ब्युटीपार्लर चालविते. तिला एक चार वर्षांचा लहान भाऊ आहे.

स्नेहाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर तिने एमएचसीआयटीचा संगणकीय अभ्यासक्रमाची शिकवणी लावली होती. त्यासाठी ती दररोज सकाळी साडेसात वाजता घरून निघायची. शिकवणी वर्ग केवळ ३०० मीटर अंतरावर असल्याने ती दररोज पायी जायची. शुक्रवारी (ता.२८) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती घरून शिकवणीसाठी निघाली.

इमारतीवरून उडी घेऊन मुलीची आत्महत्या

त्यानंतर तिने शिकवणी वर्गात आपली बॅग ठेवली. त्यानंतर ती बराच वेळ दिसली नाही. मात्र, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तिने समोरच असलेल्या पंचम अपार्टमेंटच्या चवथ्या माळ्यावरून उडी घेतली. खाली पडल्यावर स्नेहाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या प्रकाराने अनेकांना धक्का बसला. तिला खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी प्राथमिक तपासणीत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

कुणालाही उमगेना

स्नेहा सातत्याने मोबाईलवर गेम खेळायची. याबाबत तिला आई-वडील तिला नेहमीच टोकायचे. शुक्रवारी ती घरातून निघाल्यावर तिच्या मनात असे काही सुरू आहे हे आई-वडिलांनाही माहिती नव्हते. घरात तशी कुणाशीही ती वागली नाही. त्यामुळे तिने नेमके हे का केले? तिला कुठले टेन्शन होते, हे कुणालाही उमगले नाही. मात्र, मोबाईल खेळण्यास मनाई केल्याने तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT