नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर  sakal
नागपूर

Nagpur : शहराच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धा

नागरिकांनी यात सहभागी व्हावे याकरिता रोख रकमेचे पारितोषितसुद्धा दिले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी लोकसहभागातून महानगरपालिका आणि नागपूर @ २०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित या स्पर्धेत एखाद्या नगराचे किंवा भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नागरिकांचा कोणताही समूह यात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांनी यात सहभागी व्हावे याकरिता रोख रकमेचे पारितोषितसुद्धा दिले जाणार आहे. जी-२० साठी येणाऱ्या पाहुण्यांना आपले शहर चांगले दिसावे हा एकमेव उद्देश या स्पर्धेमागचा नाही. लोकांच्या सवयी बदलाव्या, आपल्या स्वच्छ शहराचा सर्वांना अभिमान वाटावा आणि गुंतवणूकदार आकर्षित व्हावे याकरिता स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोहल्ला या भागात २०० पेक्षा कमी आणि ५०० पेक्षा जास्त घरे नसावी. मोहल्ल्यातील प्रतिनिधी ८३८०००२०२५ या व्हॉट्सॲप क्रमांकावरून किंवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करू शकतात किंवा ऑफलाईन माध्यमातून, नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही स्पर्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT