crime news sakal
नागपूर

नागपूर : दगडाने ठेचून युवकाची हत्या

एमआयडीसी बुटीबोरीतील घटना, आरोपी पसार

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट : एमआयडीसी बुटीबोरी परिसरातील टाकळघाट मार्गावरील इंडोरामा गेट नं. ७ उमरी शिवार येथे एका अनोळखी व्यक्तीने दगडाने ठेचून युवकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांच्या हद्दीत घडली.

मृत युवकाचे नाव आकाश रमेश फेंडर(२२, घारफड, ता.बाभूळगाव, जि. यवतमाळ, हल्ली मुक्काम गणेशपूर, ता.हिंगणा)असे असून तो घर बांधकाम करण्याचे काम या परिसरात करायचा. सविस्तर वृत्त असे की, इंडोरामा कंपनी गेट क्र.७ जवळ टाकळघाट मार्गावरील एका नालीला लागून मृतदेह पडून असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळली. त्यावरून पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस ताफा घटनास्थळी पोहचल्यावर एक युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्याचे दगडाने तोंड ठेचून हत्या केल्याचे दिसून आले.

तसेच मृताच्या हातावर आकाश नावाचे गोंदण असल्याने व एक कागदावर मोबाईल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी मिळून आल्याने ती हत्या आकाश फेंडरची असल्याची निष्पन्न झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागपूर रवाना केला. घटनेचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कोळी, भाष्कर मेटकर, डी.बी.पथक करीत असून आरोपीचा शोध घेत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागिय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांनी भेट दिली. घटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. एमआयडीसी पोलिसांनी श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : हिंगणघाटमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT