Nagpur  Sakal
नागपूर

Nagpur : तलाठी भरतीला एका दिवसाची मुदतवाढ; उद्या रात्री ११.५५ पर्यंत करता येणार अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज १७ जुलै शेवटचा दिवस होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - तलाठी पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी असणारी महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. या विषयाबाबत सकाळने आॅनलाईन बातमी प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमि अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहिर केले.

सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज १७ जुलै शेवटचा दिवस होता. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाईट बंद होती. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचण जात असल्याची माहिती मिळताच सकाळने या विषयाकडे लक्ष वेधून पाठपुरावा केला.

त्यानंतर संध्याकाळी ई-महाभूमी (महसूल व वनविभाग) अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी यासंदर्भात मुदतवाढीबाबत शुद्धीपत्रक काढले. त्यानुसार आता तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत जी १७ जुलै रोजी ११.५५ होती.

ती आता अंतिम दिनांक १८ जुलै रोजी ११.५५ करण्यात आली आहे. तर आॅनलाईन पद्धतीने विहित परिक्षेचा शुल्क भरण्यासाठी २० जुलै रात्री ११.५५ अशी वेळ देण्यात आली आहे. सकाळने केलेल्या पाठपुराव्यामुळे तलाठी पदभरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने स्पर्धा परिक्षार्थींकडून आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Luka Modric Inspirational Journey: बाल्कन युद्धात फुटबॉल शिकलेला योद्धा! लुका मॉड्रिचचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात; जिद्द अन् चिकाटीची अविस्मरणीय गाथा...

Pune District Sowing : पुणे जिल्ह्यात दोन टक्केच पेरण्या; शेतकऱ्यांना जोरदार सरींची प्रतीक्षा

Thane Rain Accident : ठाण्यात मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पाण्यात करंट उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Khadakwasala Dam Water : पुणेकरांसाठी दिलासादायक! खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; पाणलोट क्षेत्रात पावसाने धरला जोर

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT