nagpur  
नागपूर

Nagpur : उदंड झाले डिस्पोजल ग्लास, कप!

शहर विद्रुपीकरणात भर : टपरीचालकांकडून नाल्यांत विल्हेवाट : ड्रेनेज, सिवेज लाईन तुंबण्याचे प्रकारही वाढले

- राजेश प्रायकर

नागपूर : शहरात अनेक भागांमध्ये डिस्पोजल ग्लास, कपचा सडा पडल्याचे चित्र आहे. अनेक चहा टपरीधारक कचरापेटीची सुविधा करीत नसल्याने ग्राहक रस्त्यांवर डिस्पोजल कप, ग्लास फेकून देत आहेत. परिणामी सकाळी स्वच्छ झालेले शहर दुपारी विद्रुप होत आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरील टपरीधारक डिस्पोजल ग्लास, कपची विल्हेवाट ड्रेनेज लाईनमध्येच लावत असल्याने त्याही तुंबत आहे. या प्रकाराकडे महापालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने शहराच्या विद्रुपीकरणासह सिवेज, ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणीही रस्त्यावर येत आहे.

रस्त्यावरील स्मार्ट सिटीचे बॉक्स, झाडांवर जाहिरातीचे स्टिकर चिटकवून शहर विद्रुप करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात आता डिस्पोजल ग्लास, कपचीही भर पडली आहे. सकाळी महापालिकेचे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ करतात. परंतु अनेक मोठ्या रस्त्यांवर ज्युस सेंटर, चहा टपऱ्या सुरू असून येथे येणारे ग्राहक टपरीधारक कचरापेटीची सुविधा करीत नसल्याने चहा, ज्युस पिल्यानंतर रस्त्यावर किंवा टपरीजवळच डिस्पोजल ग्लास फेकून देतात. वारा आल्यानंतर डिस्पोजल कप, ग्लास उडत जाऊन परिसरात पसरत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत शहरात डिस्पोजल ग्लास, कपचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

शहरात कचरा गाडी फिरत असली तरी टपरीधारकच हा कचरा साठवून ठेवत नाहीत. त्यामुळे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. शहर विद्रुपीकरण जोमात सुरू असून महापालिकेनेही डिस्पोजल ग्लास, कपच्या कचऱ्याला आतापर्यंत गांभीर्याने घेतले नाही. कचरापेटी न वापरणाऱ्या टपरीधारकांवर दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

एवढेच नव्हे अनेक टपरी, ज्युस सेंटर रस्त्याच्या बाजूला फूटपाथवरच आहे. अनेक ठिकाणी फूटपाथ ड्रेनेज लाईनवर आहेत. ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये डिस्पोजल ग्लास, कपची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात अऩेक ड्रेनेज लाईन तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. अनेक रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे आता डिस्पोजल ग्लासचा कचरा डोकेदुखी ठरला आहे.

स्वच्छतेचे फायदे

- आरोग्यदायी वातावरण

- मानसिक, शारिरीक विकास

- आर्थिक प्रगतीला चालना

कचरापेटीची औपचारिकता

रस्त्यांवर चहा टपरी, रस विक्रेते, नाश्ता विक्रेत्यांनाही कचरापेटी बंधनकारक आहे. ग्राहकांना डिस्पोजल ग्लास, कप कचरापेटीत टाकण्यासाठी आग्रह धरण्याची त्यांची जबाबदारी आहे. परंतु टपरीचालक कचरा साठवण्यासाठी लहान बादली ठेवून औपचारिकता पूर्ण करताना दिसत आहे. त्यामुळे ती बादली भरली की ड्रेनेज लाईनमध्ये विल्हेवाट लावली जाते किंवा ग्राहक कुठेही फेकून देत आहे.

संतांची शिकवण आठवण्याची गरज

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी अशा अनेक संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संत गाडगेबाबा हे तर स्वच्छतेचे महत्व सांगणारे थोर संत होते. त्यांच्या स्वच्छतेचा विचार, आचारावरच स्वच्छता अभियान पुढे आले. पशु, पक्षी, प्राणी सुद्धा स्वतःची स्वच्छता स्वतः करतात, असे गाडगे बाबा म्हणत. त्यांचा स्वच्छतेचा विचार केवळ महापालिकेनेच नव्हे तर प्रत्येक दुकानदार, टपरीचालक, नागरिकांनी आचरणात आणण्याची गरज आहे.

घरगुती कार्यक्रमातील डिस्पोजल ग्लास सिवेज लाईनमध्ये

अनेकांकडे कार्यक्रमादरम्यान डिस्पोजल ग्लास, कपचा वापर होतो. पाहुणे चहा, पाणी पिल्यानंतर डिस्पोजल ग्लास रस्त्यावरच फेकून देतात. हवेने उडत हे ग्लास सिवेज लाईनचे चेंबर फुटले असेल तर त्यात जमा होतात. यातूनही सिवेज लाईन तुंबण्याचे प्रकार वाढले असून सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे.

स्वच्छता हा संस्कार होय. स्वच्छतेचे संस्कार मनामनात रुजविण्याची गरज आहे. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी होईल. प्रत्येकाने निरोगी शहराचा ध्यास घेतला तर स्वच्छतेला स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. दुकानदार, टपरीचालक दुकान उघडल्यानंतर सकारात्मक उर्जेसाठी पूजा करतो, सुवासिक अगरबत्ती लावतो. हे ते दररोज न चुकता करतात. स्वच्छतेबाबतही असाच आग्रह हवा.

- कौस्तव चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT