nagpur sakal
नागपूर

Nagpur : सागवानची चोरी, दोघांना अटक

गोदामातून सागवान लाकडाचे साहित्य चोरून नेले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पारडी परिसरातील आरामशीनच्या गोदामातून सागवानच्या साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. सूरज राजेश वर्मा (वय २६, रा. पुनापूर, स्मशानभूमीजवळ), रवींद्र दिलीप शर्मा (वय २०, रा. भोलेश्वर सोसायटी, पुनापुर रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मनिलाल भाऊजी पटेल (वय ६४, रा. महादेव नगर, भरतवाडा, कळमना) यांची मुरलीधर मंदिराजवळ आरामशीन कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आरामशीनमधून सागवानाचे साहित्य आणि लाकूड चोरीला जात असल्याची माहिती समोर आली. दरम्यान १५ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोघांनीही त्यांच्या गोदामातून सागवान लाकडाचे साहित्य चोरून नेले.

याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी गोदामातून मोटारसायकलवर सागवानी लाकडाच्या २५ फेम, १५ नग सागवानी लाकूड असा एकूण १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल मोटारसायकलवर चोरून नेल्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT