Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : ‘त्या’ फोटोची तपासणी करावी : दीपक केसरकर

हा फोटो नाशिकच्या एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाचा २०१७-१८ मधील फोटो आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो झळकवून एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी त्या फोटोची तपासणी करावी. हा फोटो नाशिकच्या एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाचा २०१७-१८ मधील फोटो आहे. तेव्हा गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असल्यामुळे ते लग्नाला गेले, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

सलीम कुत्ताला नाचताना संपूर्ण महाराष्ट्राला पाहिले आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप लावण्यात येताहेत. २०१७-१८चा एक फोटो आणायचा आणि तो दाखवून चौकशीची मागणी करायची, हे चुकीचे आहे. गिरीश महाजन पालकमंत्री असताना एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. कुंभमेळ्यात मुस्लिम समाजाने सहकार्य केले होते. त्यामुळे त्या धर्मातील व्यक्तीच्या लग्नाला पालकमंत्री असलेले गिरीश महाजन गेले.

त्या लग्नातील पाहुणे कोण आहेत, याची माहिती कशी असणार. या प्रकरणी पूर्वीच चौकशी झाली आहे. त्यात धर्मगुरुचा कुठलाही दाउद इब्राहिमशी संबंध असल्याचे आढळलेले नाही. बडगुजर पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. सभागृहात फोटो दाखविणाऱ्यांनी सांगायला हवे होत की हे फोटो जुने आहे. सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण जनता पाहत असते. त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. सदस्यांना सभागृहाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले.

श्रेयासाठी मोर्चा

केवळ श्रेयासाठी राजकरण करायचे, मोर्चा काढायचे, ही आमची भूमिका नाही. मी स्वत: मुंबईचा पालकमंत्री आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीच्या जनतेच्या जीवनात चार क्षण सुखाचे यावेत त्याऐवजी नवीन विषय उकरून काढत प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. धारावीतील कुणालाही घरापासून वंचित ठेवणार नाही. दोन वर्षांपर्यंत घरभाडे सरकार देईल, असे केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT