नागपूर : सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अख्खे कुटुंब sakal
नागपूर

नागपूर : सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अख्खे कुटुंब

गुंतवणूक करा आणि लाभ मिळवा अशी ती लिंक होती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सायबर गुन्हेगाराने गुंतवणुकीवर जास्त लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क एका उच्चशिक्षित कुटुंबाची तीन लाखांनी फसवणूक केली. प्रकरणी चमपूरण ममताणी यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

इंदिरा गांधी कॉलनी निवासी चमपूरण ममतानी हा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेल्या राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करतो. काही दिवसापूर्वी त्याला सायबर गुन्हेगाराने एक लिंक पाठविली.

गुंतवणूक करा आणि लाभ मिळवा अशी ती लिंक होती. त्याने लिंकवर जाऊन ऑनलाइन खाते उघडले. एक हजार रूपयाची गुंतवणूकही केली. त्यावर त्याला ७१ रुपये मिळाले. त्यानंतर ममतानीने २ हजारांची गुंतवणूक केली. त्यावर ३०० रुपये लाभ मिळाला. लाभ मिळत असल्याने त्याचा विश्वास बसला अन् तो सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला.

त्यानंतर त्याने बहिण, भाऊ आणि बहिणीचेही खाते उघडले. संपूर्ण कुटुंबानेच ३ लाख रूपयाची गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र, चमपुरम आणि कुटुंबीयांना पैसे मिळणेच बंद झाले. लिंकही बंद झाली आणि फोनही बंद झाले. जरीपटका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT