Nagpur Sakal
नागपूर

Nagpur: चिमुकलीला डांबून गरम चाकू, सिगारेटने चटके दिले, तीन वर्षांपासून लैंगिक...

त्यापैकी सात वर्षीय मुलीला त्याने तीन वर्षांपूर्वी घरकाम करण्यासाठी नागपुरात आणले.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - बंगळुरू येथून घरकाम करण्यासाठी आणलेल्या दहा वर्षीय मुलीला घरात डांबून चटके देत, शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रकाराने एकीकडे मन हेलावले असून शहरात खळबळही उडाली आहे. पोलिसांनी आरोपी ताहा अरमान इश्‍तियाक अहमद (वय ३७ रा. अथर्वनगरी, बेसा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा परिसरात ताहा अरमान पत्नी हिना आणि साळा अजहर याच्यासह राहतो. तो प्रापर्टी डीलरचे काम करतो. ताहा याची पत्नी मुळची बंगळुरूची असून तिचा भाऊ अजहर याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीला सात अपत्य आहेत. त्यापैकी सात वर्षीय मुलीला त्याने तीन वर्षांपूर्वी घरकाम करण्यासाठी नागपुरात आणले.

यावेळी तिघेही मुलीला वेळेवर जेवण न देणे, तिच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम देणे आणि मारहाण करणे असे अमानवीय अत्याचार तिच्यावर करायचे. विशेष म्हणजे, तिला सिगारेट, गरम चाकू आणि तव्याचेही चटके द्यायचे.

हिनाचा भाऊ हा तिचे शारीरिक शोषणही करायचा. त्यामुळे ती भेदरलेल्या अवस्थेत ती घरी राहायची. विशेष म्हणजे, घराबाहेर जाताना तिला एकटे खोलीत वा कधी बाथरूममध्येही डांबून ठेवले जात होते.

गेल्या तीन वर्षांपासून बालमन हे अत्याचार मुकाट्याने सहन करीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्या वेदना असह्य झाल्या अन् आरोपींच्या कुकर्माच भंडाफोड झाला. मंगळवारी मुलीला स्नानगृहात बंद करून तिघेही बंगळुरूला गेले.

तिला खायला बिस्कीटचे पाकिट दिले. महिलेने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांनी तिघांवरही गुन्हा नोंदवित, ताहा याला अटक केली. मात्र, हिना आणि तिचा भाऊ अद्याप फरार आहेत.

असे उघडकीस आले प्रकरण

दरम्यान वीज बिल जमा न केल्याने मंगळवारी महावितरणचे कर्मचारी अर्थवनगरी येथे आले. त्यांनी अरमानच्या घराची वीज कापली. वीज गेल्याने मुलगी घाबरली. चमच्याने तिने स्नानगृहाचा दरवाजा उघडला. ती घरात आली.

खिडकीतील लोखंडी ग्रीलमधून ती कशीबशी घराबाहेर आली. चौकीदाराला ती दिसली. घरी कोणी नाही तू येथे कशी आली, अशी विचारणा चौकीदाराने केली. ती रडायला लागली. शेजारी जमले. एका महिलेने तिला घरी नेले. तिची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT