पोलिस निलंबित  sakal media
नागपूर

Bribe Case : शंभर रुपयाची लाच भाेवली, वाहतूक पोलिस निलंबित

व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल : वर्दीला फासला काळीमा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका वाहतूक पोलिस शिपायाने शंभर रुपयाची लाच घेतल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने निलंबित केले आहे. किशोर दोरखंडे असे निलंबित शिपायाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, अजनी वाहतूक शाखेचा कर्मचारी किशोर दोरखंडे हा मंगळवारी सकाळीच तुकडोजी चौकात कर्तव्यावर होता. दरम्यान मेडिकल रुग्णालयातील दोन परिचारिकांना किशोर यांनी पकडले. हेल्मेट नसल्याचे सांगून ५०० रुपये दंडाची पावती तयार करण्याची धमकी दिली. त्यांनी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगून सोडण्याची विनंती केली.

मात्र, त्याने दंडाची पावती तयार करण्याऐवजी दोनशे रुपयांची लाच मागितली. परिचारिकेने २०० रुपये नसल्याचे सांगताच त्याने १०० रुपये देण्यास सांगितले. एका परिचारिकेने किशोर यांना १०० रुपये दिले आणि सुटका करवून घेतली.

मात्र, हा सर्व प्रकार तुकडोजी चौकातील एका युवकाने मोबाईलमध्ये कैद केला. ती चित्रफीत लगेच समाजमाध्यमांवर व्हायरल केली. ही चित्रफीत पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी शहानिशा करून वाहतूक कर्मचारी किशोर दोरखंडे याला निलंबित केले. वाहतूक पोलिस दलात लाचखोरी वाढली असून अनेक पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी घोळका करून वाहनचालकांकडून वसुली करीत असल्याने वाहन चालकांमध्येही मोठी नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

SCROLL FOR NEXT