nagpur sakal
नागपूर

Nagpur : चाकूच्या धाकावर ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटले; नागपूर - आमडी मार्गादरम्यानची घटना

फिर्यादीसह सर्वांनीच आम्ही तिकिट काढल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

रामटेक - प्रवासादरम्यान खाजगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना १४ ऑक्टोबरला नागपूर ते आमडी मार्गादरम्यान घडली. यावेळी आरोपींनी ८० प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली.

अमन इश्वर इंगळे(वय २६ वर्ष रा. रामबाग नागपूर), गुलाब शाबीर शेख(वय ३२ वर्ष रा. कपीलनगर नागपूर), राशीक शेख रफीक शेख (वय ३४ वर्ष रा. दिघोरी नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सिद्घार्थ पांडे याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तो सिंकदराबाद येथून १३ ऑक्टोंबरला आपल्या गावी जाण्याकरिता जी. एस.आबा टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या टीएस ११२ यूसी ९१६५ या गाडीत ३२०० रुपये तिकीट घेवून बसला. त्याच्या सोबत हैदराबाद येथून आणखी ८० जण या गाडीत बसले. ही ट्रॅव्हल्स १४ ऑक्टोबरला नागपूर येथे पोहचली.

तेव्हा फिर्यादी व त्याच्या सोबत असलेल्या ८० प्रवाशांना त्या ट्रॅव्हल्स मधून उतरवून ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी १७ पी १०५५ मध्ये बसण्यास सांगितले. त्यानुसार सर्व प्रवासी सदर ट्रॅव्हल्स मध्ये बसले. यावेळी त्यांच्या सोबत आणखी दोन इसम या गाडीत बसले. नागपूरच्या समोर पेट्रोलपंपावर ड्रायव्हरने गाडी थांबवली तेव्हा आणखी दोघे या गाडीत चढले. त्यानंतर ट्रॅव्हल्स समोर निघताच ट्रॅव्हल्स मध्ये चढलेले त्या चौघांनी सर्वांना तिकिटाचे पैसे मागायला सुरुवात केली. फिर्यादीसह सर्वांनीच आम्ही तिकिट काढल्याचे सांगितले.

पण या चौघांनी वाद उपस्थित करून लोंकाना मारहाण करण्यास सुरुवात केली. सोबतच चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून तब्बल १ लाख ९६ हजार ७५० रुपये बळजबरीने वसूल केले आणि ट्रॅव्हल्स आमडी गावाजवळ थांबताच पसार झाले. सिद्घार्थच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी चोघांवरही गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, नितेश डोकरीमारे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT