कैदी अन् पोलिसांची रंगली ओली पार्टी sakal
नागपूर

Nagpur : उपचारासाठी आलेला कैदी अन् पोलिसांची रंगली ओली पार्टी

मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस तैनात असतात.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस तैनात असतात. मात्र उपचारासाठी आलेला कैदी आणि पोलिस एमआरआय काढण्यासाठी गेले आणि ओली पार्टीकरून डोलत परत आल्याची घटना मेडिकलमध्ये घडली.

पाच तास कैदी आणि पोलिस गायब असल्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. रात्री उशिरा नशेत नागोबासारखे डोलत ते वॉर्डात दाखल झाले. नशेत असताना ना या कैद्याचे नमुने घेतले, ना पोलिसांचे. विशेष म्हणजे वैद्यकीय चाचणी केली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. बुधवार ३१ मे रोजी वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये ही घडलेली घटना. सायंकाळी ७ ची वेळ. अविनाश(२३) असे उपचारासाठी आलेल्या कैद्याचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. ३० मे रोजी मध्यरात्री १२.५ मिनिटांनी उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले.

एमआरआयसाठी गेले अन ‘डोलत’ आले

उपचार सुरु झाले. सोबत चंद्रपूर येथील दोन पोलिस तैनात होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी जात असल्याचे सांगून कैदी आणि दोघे पोलिस निघाले. पाच तास उलटूनही कैदी आणि पोलिस परत आले नाही. यामुळे वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये एकच खळबळ उडाली. वॉर्डातील इनचार्ज सीस्टरने तत्काळ मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना कळविले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष

कैदी आणि पोलिस असे तिघेही पाच तासांपासून गायब असल्यामुळे वॉर्डातील परिचारिकेने तत्काळ सीएमओ यांना कळविले. सीएमओ ने मेडिकल आवारातील पोलिस चौकीमध्ये कॉल केला व तक्रार दाखल करण्याची सूचना केली. परंतु त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. कैद्यांसोबत पार्टीसाठी एकप्रकारचे हे सेटलमेंट आहे का? असा सवाल विचारला जात असून अशा घटनांची तक्रार न नोंदवता कानाडोळा करत असल्यास मेडिकल आवारातील पोलिस चौकीचे काय काम अशी विचारणा आता होत आहे.

कैदी घेऊन जाताना पोलिस नव्हते गणवेशात

वॉर्डात दाखल रुग्ण कैद्याला उठता येत नसल्यास सोनोग्राफी, रक्त चाचणी असो की, एक्सरे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय, या निदानासाठी वॉर्डातील अटेंडन्टला सोबत पाठविण्यात येते. मात्र या कैद्यासोबत पोलिस असल्यामुळे अटेंडंट पाठवला गेला नसावा. पण येथे एमआरआयचे नाव सांगून पोलिसच सोबत घेऊन गेले आणि थेट ओली पार्टी करूनच वॉर्डात परत आले. विशेष असे की, वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये कोणत्याही कैद्याला दाखल केल्यानंतर २४ तास वॉर्डातील कैदी कक्षात पोलिस गणवेशात तैनात असतो. परंतु अविनाश या कैद्यासोबत असलेला पोलिस कैद्याला घेऊन जाताना गणवेशात नसल्याची चर्चा होती.

वॉर्डात दाखल झालेला कैदी रुग्ण एमआरआयचे नाव सांगून बाहेर गेला. सोबत पोलिस होते. वॉर्डात हा कैदी बराच वेळ न दिसल्यामुळे विचारणा केली. तशी परिचारिकांनी नोंद केली. पार्टी करूनच कैदी आणि पोलिस परतले. उपचार करणे डॉक्टरांचे काम आहे. कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिस आहेत. चंद्रपूरमध्ये तैनात पोलिसांच्या वरिष्ठांना रीतसर तक्रार देण्यात आली. त्यांच्यावर कारवाईचे अधिकार त्यांना आहेत.

— डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT