Tur Dal Market Rate Sakal
नागपूर

Tur Dal Market Rate: तूर डाळ गाठणार दीडशेचा टप्पा

पेट्रोल, सिलिंडरपाठोपाठ आता तूर डाळीचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे साधा वरणभात करतानाही गृहिणींना विचार करावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पेट्रोल, सिलिंडरपाठोपाठ आता तूर डाळीचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे साधा वरणभात करतानाही गृहिणींना विचार करावा लागणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात तूरडाळ थेट ११५ ते १२२ रुपये किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात आता एक किलो तुरीसाठी १२५ ते १३५ रुपये मोजावे लागत आहे.

सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून डाळीकडे पाहिले जाते. आता ही महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न पडू लागला आहे. येत्या काही दिवसात तूर डाळीच्या दरात वाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून तूर व हरभरा डाळीच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. आवक कमी झाल्याने तूर डाळींचे दर प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढले आहे. आवक कमी असल्याने साठेबाजांनी तुरीची साठवण केलेली आहे.

त्यामुळेच कृत्रिमरित्या ही भाववाढ केल्याची चर्चा बाजारात नव्याने होत आहे. बाजारात तुरीची आवक कमी झालेली असल्याने भाव वाढ सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी तूर डाळीचे भाव प्रतिक्विंटल १०५ ते ११० रुपये होते. ते ११५ ते १२२ रुपयांवर पोहोचले आहेत. तूर डाळीचे उत्पादन घटल्याने ही भाववाढ सुरु आहे.

यंदा तुरीच्या उत्पादनात २५ टक्के घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. होळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे भावही प्रतिक्विंटल ६२०० ते ६४०० रुपयांवरून ६६००- ६८०० रुपयांवर गेले आहेत.

कृत्रिम टंचाईचा गंध

तूर डाळींच्या दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. याला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने गव्हाच्या दरात घसरण झालेली आहे. गेल्या पंधरा दिवसात गव्हाचे दर ५ ते ६ रुपये प्रतिकिलो कमी झालेले आहेत. ३५ रुपये किलो असलेले गव्हाचे दर ३० रुपयांवर आले आहे. गव्हासोबतच पीठ, रवा आणि मैद्याचे दरही कमी झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT