accident Sakal
नागपूर

Nagpur Accident: एका मागोमाग धडकल्या कार, दोघे जखमी; कोराडी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी

मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोराडी महामार्गावर ट्रक अचानक थांबल्याने कार एकामागून एक धडकल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री १०.४५ च्या सुमारास उघडकीस आली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Accident of Cars : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोराडी महामार्गावर ट्रक अचानक थांबल्याने कार एकामागून एक धडकल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री १०.४५ च्या सुमारास उघडकीस आली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

पोलिसांनी ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री एकामागोमाग एक अशा चार ते पाच कार धडकल्याने परिसरात खळबळ उडाली. यामुळे नागरिकांनी मानकापूर चौकात धाव घेतली. हजारोंच्या संख्येत नागरिक येथे गोळा झाले होते. यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.

मानकापूर चौकात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू अपघातांमध्ये झाला आहे. दर एक दोन दिवसांनी या चौकासह रिंगरोड चौकात लहानमोठे अपघात होतात. मोठ्या अपघातानंतरही या ठिकाषी अपघात प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रविवारच्या घटनेने येथील अपघातप्रवण स्थळाच्या प्रश्‍नाला अधोरेखित केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT