Nagpur Two women from Nagpur were Dubai Won six gold medals in international swimming competitions  sakal
नागपूर

Nagpur : नागपूरच्या दोन महिलांचा दुबईत डंका; आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकाविली सहा सुवर्णपदके

६० वर्षांवरील वयोगटात सहभागी सुषमा यांनी १०० व २०० मीटर फ्रिस्टाईल आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांमध्ये ही पदके जिंकली.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - उपराजधानीतील डॉ. राजश्री जैन व सुषमा वाजपेयी या दोन ज्येष्ठ महिला जलतरणपटूंनी दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रौढांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत सहा सुवर्णपदके जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

शारजाह जलतरण केंद्रात आयोजित या स्पर्धेत दोघींनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली. ६५ वर्षांवरील वयोगटात सहभागी डॉ. जैन यांनी २०० व ४०० मीटर फ्रिस्टाईल आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत तर ६० वर्षांवरील वयोगटात सहभागी सुषमा यांनी १०० व २०० मीटर फ्रिस्टाईल आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांमध्ये ही पदके जिंकली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते दोघींनाही पदके देऊन सन्मानित करण्यात आले. वयाच्या ३६ व्या वर्षांपासून स्विमिंग करीत असलेल्या डॉ. जैन यांनी आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ११९ सुवर्ण, ६६ रौप्य व २२ ब्राँझसह एकूण दोनशेवर पदकांची कमाई केली आहे. तर सुषमा यांनीही देशविदेशातील जलतरण स्पर्धा गाजविल्या आहेत.

डॉ. जैन या सदर येथील रेल्वे ऑफिसर्स क्लब येथे, तर सुषमा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जलतरण तलावावर सराव करतात.

त्यांनी यशाचे श्रेय प्रशिक्षक प्रभाकर साठे, जयप्रकाश दुबळे, भोजराज मेश्राम, संजय बाटवे व रोशन यांना दिले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा प्रौढ जलतरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT