नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी.चे नवीन नियम लागू केले आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरूवातीस घेण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ साली काढलेल्या दिशानिर्देशावरुन विद्यापीठात २०१५ साली पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ परीक्षेस सुरवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षापूर्वी विषयनिहाय ‘पेट-२’ ही परीक्षाही लागू करण्यात आली. मात्र, पेट-१ परीक्षेच्या स्वरूपामुळे ती उत्तीर्ण करणाऱ्या मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व एक समिती डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखालीही तयार करण्यात आली होती.
या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार मार्चमध्ये झालेल्या बैठकीत हा अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अहवालात ३२ शिफारशींचा समावेश होता. दरम्यान त्यासंदर्भात नवी समिती तयार करून दोन्ही समितीच्या शिफारशीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार या शिफारशी मान्य करीत विद्यापीठाने अधिसूचना काढली आहे.
अशी असेल ‘पेट' परीक्षा
आत्तापर्यंत नागपूर विद्यापीठात पेट -१ आणि पेट -२ या दोन प्रवेश परीक्षा घेण्यात यायच्या. मात्र, आता विद्यापीठाने पेट-२ परीक्षा रद्द केली आहे. पेट-१ च्या स्वरूपात बदल करून त्याच्या पहिल्या टप्प्यात रिसर्च मेथडॉलॉजी आणि दुसरा टप्प्यात विषयाचे ज्ञान यावर प्रश्न विचारले जातील. हे संपूर्ण ५० प्रश्न बहुवैकल्पीक असून विश्लेषणात्मक राहणार नाहीत.
-पीएच.डी. मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षाची अट रद्द.
-पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा.
-शोधप्रबंध सादर केल्यावर १२० दिवसात ‘व्हायवा’ घेणे.
-मान्यताप्राप्त पदवी व पदव्युत्तर प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून नेमता येणार
-एम.फील धारकांना कोर्स वर्क अट रद्द.
- ४ हजार प्रयोगशाळा शुल्कापासून मुक्तता
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.