नागपूर

नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर ५० लाखांच्या मानहानीचा दावा! माजी प्रमुखांनी लावले आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर ५० लाख रुपयांच्या मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Defamation Suit against VC: नुकतेच शतक महोत्सव साजरा केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर ५० लाख रुपयांच्या मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक व प्रमुख प्रा. मोहन काशीकर यांनी हा दावा केला आहे.

या प्रकरणी वरिष्ठ दिवाणी व सत्र न्यायालयाने निर्णय दिला. याचिकेनुसार, कुलगुरू सुभाष चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग करून सूडबुद्धीने आणि आकसाने केलेल्या कारवाईमुळे माझी अप्रतिष्ठा झाली. तसेच, सामाजिक प्रतिमेचे हनन झाल्याचा प्रा. काशीकर यांचा दावा आहे.

एक प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून शैक्षणिक वर्तुळात असलेले स्थान डागाळले, मानसिक वेदना व मनस्ताप झाला, शारीरिक त्रास झाला, आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि भविष्यातील अनेक संधी मिळण्यात बाधा निर्माण झाली. (Latest Marathi News)

या सर्व मानहानीची नुकसान भरपाई म्हणून सुभाष चौधरी ह्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपात ५० लाखांचा दावा प्रा. काशीकर यांनी केला आहे. न्यायालयाने प्रतिवादी चौधरी यांना वैयक्तिक स्वरूपात नोटीस बजावली असून १८ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

प्रकरण काय?
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी २०२० मध्ये प्रा. काशीकर यांना विभागप्रमुख पदावरून हटवून त्यांची वेतनवाढ थांबवली होती आणि बिनबुडाचे कारणे देऊन विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्याविरुद्ध प्रा. काशीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रा. काशीकर यांच्या बाजूने निर्णय देत कुलगुरूंनी काशीकर यांच्यावर केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून कुलगुरूंच्या अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, प्रा. काशीकर यांचे विभागप्रमुख पद कायम ठेवून त्यांची रोखलेली वेतनवाढ ७ टक्के व्याजाने देण्याचे आदेश विद्यापीठाला दिले होते. त्यानंतर, कुलगुरूंना लिखित माफीनामा देखील न्यायालयात सादर करावा लागला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT