nagpur university e sakal
नागपूर

विद्यापीठाकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत, अर्जासाठी नेमक्या कोणत्या कागदपत्रांची गरज?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून देशात टाळेबंदीची (corona lockdown) स्थिती आहे. अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबावर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुटण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTM nagpur university) विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत विद्यार्थी साहाय्य योजना (student helping scheme) राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी योजनेसाठी ३० मेपर्यंत अर्ज करावयाचा आहे. (nagpur university help to needy student in corona time)

दरवर्षी विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीच्या माध्यमातून मदत करण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया राबवून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी डॉ. अभय मुदगल यांनी पुढाकार घेतला. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन अर्ज करता येणे शक्य नाही. सध्या विद्यापीठाने त्यास ३० मे पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे असे आवाहन संचालक डॉ. अभय मुदगल यांनी केले आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे -

  • वडिलांचा २ लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला

  • मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या वर्षाची गुणपत्रिका

  • चालू वर्षाच्या परीक्षा शुल्क भरल्याची पावती

  • शिष्यवृत्ती मिळत असल्यास त्याची माहिती

  • प्राचार्य, विभागप्रमुखांकडून स्वाक्षरी केलेली प्रतिज्ञापत्र

  • एक रद्द धनादेश आणि बॅंकेची माहिती

कोण ठरणार अपात्र?

  • आई वडीलांचे उत्पन्‍न २ लाखापेक्षा अधिक असल्यास

  • दुसऱ्यांदा पदवी आणि पदव्युत्तर पदवीत शिकत असल्यास

यासाठी मिळणार मदत -

विद्यापीठाचे शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, वसतिगृहात राहण्याचा खर्च.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT