nagpur university lit creating self study report for naac  
नागपूर

एलआयटी जाणार 'नॅक' मूल्यांकनासाठी, सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करण्यास सुरुवात

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीद्वारे (एलआयटी) नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. त्यानुसार विद्यापीठाचे मूल्यांकन होताच 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिन्याच्या शेवटी तो नॅककडे सादर करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाद्वारे एलआयटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालय चालविण्यात येते. या महाविद्यालयांची गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, महाविद्यालयांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या वेळी बॅरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनाची परवानगी मागितली होती. मात्र, त्यावेळी विद्यापीठाने रिक्त पदांचे कारण समोर करून ती परवानगी नाकारली होती. यानंतरही महाविद्यालयाकडून नॅकसाठी अर्ज करण्यात आला होता. दरम्यान 'एलआयटी'ला स्वायत्त संस्था करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घालण्यात आले होते. मात्र, आता ते त्या खात्याचे मंत्री नसल्याने त्यावरील निर्णय थंडबस्त्यात पडला. मात्र, एलआयटीने विद्यापीठाकडून नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची परवानगी घेतली. त्यासाठी आवश्यक असलेला महाविद्यालयाच्या 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) तयार करण्यास सुरुवात झालेली आहे. महिन्याभरात तो नॅककडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. 

हेही वाचा -

एनबीएसाठीही जाणार - 
विद्यापीठाच्या प्रत्येक अभ्यासक्रमाला 'एनबीए'चा दर्जा मिळावा यासाठी एलआयटीद्वारे बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यासाठी ८० टक्के पद भरती करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांपूर्वी १७ पदांसाठी जाहिरात देत पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ६० टक्के पद भरल्यावरही त्या पदांना तीन वर्षांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. मात्र, आता ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नॅकचे मूल्यांकन होताच एलआयटीद्वारे 'एनबीए'चा दर्जा मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एंट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळ ठरली!

Lowest Home Loan: बँक ऑफ महाराष्ट्रची 'मान्सून धमाका' ऑफर! होम लोनच्या व्याजदरात कपात आणि इतर सुविधा; मात्र 'ही' अट आवश्यक

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात २९११७ क्युसेक विसर्ग करण्यात येणार, नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा

Ulhasnagar Accident: ट्रकची एकामागोमाग सात वाहनांना धडक, चालक फरार; थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT