Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Crime: मिनी बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द; पोलिसांचे प्रयत्न झाले सफल, आरोपी अटकेत

वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश भारुका यांनी मिनी बॉम्ब प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी देवेश हिंगवे याला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करीत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले.

सकाळ डिजिटल टीम

Mini Time Bomb Case Court Denied Bail: वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश भारुका यांनी मिनी बॉम्ब प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी देवेश हिंगवे याला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करीत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले. पोलिसांनी शुक्रवारी (ता.आठ) आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे. मात्र यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विठ्ठलवॉर्डातील ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या मुलाचे लग्न वकिली व्यवसाय करणाऱ्या मुलीसोबत जुळले. हे लग्न होवू नये म्हणून एकतर्फी प्रेम करण्याऱ्या आरोपीने या परिवाराला धमकावण्याकरिता युट्युबच्या माध्यमातून बॉम्ब बनविण्याची माहिती गोळा करीत एक बॉम्ब त्यांच्या घराच्या फाटकाला लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. (Latest Marathi News )

मात्र, न्यायालयाने जामीन दिल्याने पोलिसांनी वरच्या कोर्टात धाव घेतली. येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी प्रशांत पाटणकर यांनी वर्धा जिल्हासत्र न्यायालयात पोलिसांची बाजू मांडली आणि प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीला दिलेला जामीन रद्द करून आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वाढवली पोलिस कोठडी

या प्रकरणातील आरोपी देवेश हिंगवे याने शुक्रवारी (ता.आठ) दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. घारळ यांनी शुक्रवार (ता.१५) पर्यंत वाढवून पोलिस कोठडी देण्याचा आदेश पारित केला. (Latest Marathi News )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT