Nagpur Double Murder Case: शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काल पदभार स्वीकारताच, शहरात गुरूवारी (ता.१) दुहेरी खुनाची थरारक घटना समोर आली. फायनान्सवर दूचाकी घेऊन त्याचे पैसे आणि इतर पैशांच्या देवान-घेवाणातून एका मित्राने दोन मित्रांवर राफ्टरने वार करीत त्यांचा खून केला. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात गुरूवारी (ता.१) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
कृष्णकांत भट (वय २४ रा. श्यामधाम मंदिरजवळ, नंदनवन) आणि सनी धनंजय सरूडकर (वय ३३, रा. जलालपूरा, गांधीबाग) अशी मृतकांची नावे आहेत. किरण शेंडे (वय ३०), योगेश शेंडे (वय २५, दोन्ही रा.साईबाबानगर) आणि दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. किरण आणि योगेश शेंडे हे पारडीतील ऑटोडील्स मोटर डिलरकडे कामाला होते. ते साईबाबानगरात भाड्याने राहत होते. मृतक कृष्णकांत आणि सनी हे दोघेही फायनान्सचे काम करीत होते. तसेच ते व्याजानेही पैसे देण्याचे काम करायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण त्यांचा मित्र असल्याने कृष्णकांत आणि सनी यांनी किरणला दूचाकी घेण्यासाठी पैसे व्याजाने दिले होते. काही महिने किरणने नियमित व्याजाते हप्ते भरले. मात्र, त्यानंतर त्याने ते पैसे भरणे बंद केले. त्यामुळे कृष्णकांत आणि सनी हे दोघेही त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते. (Latest Marathi News)
मात्र, किरण त्यांना टाळत वारंवार टाळत होते. दरम्यान काल किरणने त्यांना रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साईबाबा येथील घरी पैशाच्या वाद मिटविण्यासाठी बोलाविले. तिथे आल्यावर कृष्णकांत आणि सनी यांनी त्याला व्याजाचे पैसे आणि फायनान्सचेही हप्ते मागितले.
त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे किरण, त्याचा लहान भाऊ योगेश त्यांच्या दोन साथीदारांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. किरण आणि योगेशने लाकडी राफ्टरने डोक्यावर वार करण्यास सुरुवात केल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चौघेही पळून गेले.
दरम्यान नागरिकांनी याबाबत वाठोडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, तपासास सुरुवात केली. आज सकाळी पोलिसांनी किरण आणि योगेशसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. (Latest Marathi News)
पोलिस आयुक्तांना सलामी
शहराचे नवे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रात्रीच लगबगीने पदभार स्वीकारला. त्यानंतर काहीच तासाने शहर दुहेरी खुनाने हादरले. त्यामुळे नव्या पोलिस आयुक्तांना नागपुरात खुनाने सलामी मिळाल्याची चर्चा रंगली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.