राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ sakal
नागपूर

नागपूर : माध्यमबंदीच्या निर्णयावर कुलगुरूंची माघार

सदस्यांचा आक्रमक पवित्रा : सहा तासांत केवळ दोन विषयांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी सध्या आपल्या मनमानी निर्णयामुळे सिनेट आणि इतर प्राधिकरण सदस्यांच्या निशाण्यावर आहेत. आपल्या सोयीनुसार नियमांचा अर्थ लावणे, इतरांचे म्हणणे न ऐकणे, सिनेट सदस्यांना मुद्दे मांडण्यापासून रोखणे असे आरोप कुलगुरूंवर होत आहेत. बुधवारी तब्बल दीड वर्षानंतर सिनेटची थेट बैठक झाली. त्यात प्रशासनाला विविध मुद्यांवर धारेवर धरत सदस्यांनी चांगलेच जेरीस आणले. विशेष म्हणजे, त्यांनी घेतलेला प्रसारमाध्यमांना मनाईचा निर्णय सदस्यांच्या दबावाखाली परत घ्यावा लागला. पाच तासांच्या कामकाजात कुलगुरूंना विषय पत्रिकेतील एकही बाब पूर्ण करता आली नाही.

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या टीकात्मक बातम्यांमुळे संतप्त झालेल्या डॉ. चौधरी यांनी बुधवारच्या सभेत पत्रकारांना बंदी घातली. विद्यापीठ कायद्यातील नियमांचाही संदर्भ दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिनेटमध्ये प्रसारमाध्यमांना पाहूनच सदस्य मुद्दे मांडतात याशिवाय ते ताणून धरतात. त्यामुळेच त्यांनी केवळ माध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. मात्र बुधवारी सिनेट सदस्यांनी कुलगुरूंच्या सभेला कडाडून विरोध केला. यावेळी जोपर्यंत हा निर्णय मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत सभा सुरू होऊ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कुलगुरूंना निर्णय मागे घ्यावा लागला.

सभागृहात ११ ते ४ वाजेपर्यंत चाललेल्या कामकाजात कार्यसूचीतील दोन मुद्दे सोडविण्यात आले. यामुळे ६ तास चाललेल्या सिनेट सभेत एकही मुद्दा कुलगुरूंना निकाली काढता आला नाही. बुधवारी पुन्हा सभा तहकूब करण्यात आली असून, आता उद्या दुपारी १ नंतर सिनेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रस्ताव, प्रश्न डावलले कसे?

विद्यापीठात सिनेट सर्वोच्च सभा असल्याने सर्वच प्रश्न सिनेटमध्ये मांडता येतात. त्यावर तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा सदस्यांना असते. त्यामुळे सदस्यांनी प्रश्न व प्रस्ताव मांडले होते. मात्र कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय संबंधित प्राधिकरणे घेतील, असे सूचविले. यामुळे सदस्य सुरुवातीपासून आक्रमक झाले. विरोधातील बहुतांश सदस्यांचे प्रश्न व प्रस्ताव इतर प्राधिकरणात पारित झाल्यानंतर त्यात सिनेटमध्ये चर्चा होईल, असे उत्तर देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT