Vidarbha Sahitya Sangh new President Pradeep Date 
नागपूर

Nagpur : विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते

नागपूर येथील कार्यालयात वि. सा. संघाच्‍या कार्यकारिणीची बैठक पार पडली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते यांची आज झालेल्‍या कार्यकारिणीच्‍या तातडीच्‍या बैठकीत निवड करण्‍यात आली. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या सांस्‍कृतिक संकुल, सीताबर्डी, नागपूर येथील कार्यालयात वि. सा. संघाच्‍या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मनोहर म्‍हैसाळकर यांचे निधनानंतर वि. सा. संघाचे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते.

विदर्भ साहित्‍य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्‍या नावावर अध्‍यक्षपदासाठी शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्‍वयक म्‍हणून कार्यरत आहेत.

प्रदीप दाते यांना संस्‍थात्‍मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्‍या सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्‍कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहेत. यशवंतराव दाते स्‍मृती प्रतिष्‍ठानचे ते अध्‍यक्ष असून अनेक संघटनांमध्‍ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

विदर्भ साहित्‍य संघाशी गेल्‍या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळात ते विदर्भ साहित्‍य संघाचे प्रतिनिधीत्‍व करीत आहेत. महाराष्‍ट्रातल्‍या अनेक सामाजिक कार्यकर्त्‍यांशी व साहित्यिकांशी त्‍यांचे निकटचे संबंध आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात विदर्भ साहित्‍य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्‍वास कार्यकारिणीतर्फे व्‍यक्‍त करण्‍यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT