vidhan bhavan nagpur sakal
नागपूर

विदर्भाला सापत्न वागणूक; वर्षभरात एकही मंत्री फिरकला नाही

नागपूरचे विधानभवन उपेक्षितच

नीलेश डोये

नागपूर : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांच्यातील दरी कमी व्हावी, या उद्देशाने नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचा एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. निदान मंत्र्यांनी महिना, दोन महिन्यात एकदा तरी या कक्षात येऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, गेल्या वर्षभरात एकही मंत्री विधानभवनाकडे फिरकला नाही.

विदर्भाला सापत्न वागणूक मिळत असल्याच्या भावनेतून स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आजही लढा सुरू आहे. वैदर्भींच्या भावना लक्षात घेता विधिमंडळ सचिवालयाचा एक कक्ष नागपुरात सुरू करण्याची कल्पना तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली होती आणि जानेवारी २०२१ ला कक्ष सुरूही झाला. अध्यक्ष, सभापती आणि मंत्री यांनी महिना दोन महिन्यात नागपुरातील विधानभवनात येऊन काम करण्याची अपेक्षा तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले तसेच विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली होती. पण परंतु गेल्या वर्षभरात एकही पदाधिकारी किंवा मंत्र्याने विधानभवनाता पाऊल ठेवले नाही.

संयुक्त महाराष्ट्रात नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला. विदर्भ महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत उपेक्षित राहिला. निधी अपक्षेनुसार मिळत नाही. त्याला मागास ठेवण्यात आले. त्यामुळेच वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होते. हे कक्ष सुरू झाल्याने आपुलकीची भावना निर्माण होईल. या कक्षामुळे लोकप्रतिनिधी, नागरिकांना मुंबईला येण्याची गरच पडणार नाही. अनेक कामे येथूनच होतील,अशी अपेक्षा होती. पण कक्ष फक्त नाममात्र असून विधानभवन उपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंत्र्यांची पसंती विभागीय आयुक्त कार्यालय

गेल्या वर्षभरात अनेक मंत्री नागपूरला आलेत. अनेक बैठकाही घेतल्या. परंतु त्यापैकी एकाही मंत्र्यांनी विधानभवनात पाऊल ठेवले नाही किंवा बैठका घेतल्या नाही. सर्वांनीच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नागपूरला भेट दिली. परंतु त्यांनीही विधानभवनात पाऊल ठेवले नाही. गेल्या दोन वर्षात विधिमंडळाचे अधिवेशन न झाल्याने एकाही मंत्र्याचा दर्शन विधानभवनाला झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT